गडचिरोलीत भीषण अपघात : रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या ६ मुलांना ट्रकने चिरडले, मुख्यमंत्री फडणवीस यांची मदतीची घोषणा

Published : Aug 07, 2025, 12:57 PM ISTUpdated : Aug 07, 2025, 02:46 PM IST
accident

सार

गडचिरोली-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून, भरधाव ट्रकने पाच मुलांना चिरडले आहे. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत.

गडचिरोली: गडचिरोली येथे भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रकने ६ मुलांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला असून दोघांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. सहा मुलं रस्त्यावर व्यायाम करताना ट्रकने धडक दिल्यामुळं ही दुर्घटना घडली आहे.

दोन मुलांचा जागेवर झाला मृत्यू 

दोन मुलांचा यावेळी जागेवर मृत्यू झाला आणि दोन जणांचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातानंतर काटली गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोघांवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची केली घोषणा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मृताच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केला आहे, तर मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचंही सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल'.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट