रत्नागिरीमध्ये मिनी बस आणि एलपीजी गॅस सिलिंडर वाहणाऱ्या टॅंकरचा झाला भयंकर अपघात

Published : Jun 08, 2025, 11:28 AM ISTUpdated : Jun 08, 2025, 03:20 PM IST
ratnagiri accident

सार

रत्नागिरी जिल्ह्यातील बावंडी गावाजवळ शनिवारी सकाळी खासगी मिनी ट्रॅव्हल्स आणि सीएनजी टँकर यांच्यात भीषण अपघात झाला. ज्यात घरं, गुरांचा गोठा आणि वाहने जळून खाक झाली.

रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदी येथे सकाळी खासगी मिनी ट्रॅव्हल्स आणि सीएनजी टँकर यांच्यात भीषण अपघात झाला.  या आगीत घरं, गुरांचा गोठा आणि वाहने जळून खाक झाली असून, २५ जणांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

आगीने पेटला संपूर्ण परिसर

अपघात इतका भीषण होता की टँकर आणि ट्रॅव्हल्स यांना धक्का लागल्यानंतर काही क्षणातच आग भडकली. या आगीचा विळखा आसपासच्या घरांना, गुरांच्या गोठ्याला आणि उभ्या असलेल्या वाहनांनाही बसला. दोन दुभती जनावरे या आगीत जखमी झाली असून एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घरावरील फायबर पत्रेही पेटले. जखमींवर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू या घटनेत सुमारे २० ते २५ नागरिक जखमी झाले असून, त्यांना तातडीने रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि इतर शासकीय यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. टँकरमधून सुरू असलेली सीएनजी गळती तातडीने थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी दमदार प्रयत्न सुरू आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय