आदित्य ठाकरे आणि राणे पिता पुत्रांमध्ये राजकोट किल्यावर संघर्ष सुरु

Published : Aug 28, 2024, 01:31 PM ISTUpdated : Aug 28, 2024, 03:29 PM IST
Aaditya Thackeray

सार

सिधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्यावर आता मोठा राडा होत असल्याचे दिसून येत आहे. हा राडा अदित्य ठाकरे आणि नारायण राणे या दोन पक्षांमध्ये राढा होत असल्याचे दिसून येत आहे.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्यावर आता मोठा राडा होत असल्याचे दिसून येत आहे. हा राडा अदित्य ठाकरे आणि नारायण राणे या दोन पक्षांमध्ये राढा होत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी अदित्य ठाकरे हे किल्यावर ठाण मांडून बसले असून किल्याच्या गेटवर राणे पिता पुत्र दोघेही उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी याठिकाणी होत असलेल्या भांडणामुळे सर्वच परिस्थिती बिघडली आहे. 

आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात निर्माण झाला वाद - 
राजकोट येथील किल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी येथे वाद झाल्याचे दिसून आले. या दोघांच्या कार्यकर्त्यांनी येथे एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. राणे पिता पुत्र यांनी किल्याच्या दरवाजाजवळ ठाकरे यांना जाऊन देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे यावेळी येथे पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने ठाकरे यांना बाहेर जाऊन द्यावे असे सांगितले आहे. 

उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद सुरु - 
उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची आता पत्रकार परिषद सुरु आहे. येथे नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडत असून येथे महाविकास आघाडी आपले म्हणणे मांडताना दिसून येणार आहेत. 

PREV

Recommended Stories

ZP-Panchayat Samiti Election : ग्रामीण भागातील राजकारणाचं रणशिंग फुंकलं! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; 'या' दिवशी मतदान!
आता 10 मिनिटांत डिलिव्हरी बंद, Blinkit Swiggy Zomato Zepto ने सेवा थांबवली