
१.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ मालवण येथे विरोधी पक्षाकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित राहणार आहेत.
२. महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर तातडीची बैठक आयोजित केली जाणार असून नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पाटोळे हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
३. मनसे प्रमुख राज ठाकरे आज बदलापूरमध्ये जाऊन पिढीत कुटुंबाची भेट घेणार आहेत.
४. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आजपासून सुरु होणार आहे.
५. आदित्य ठाकरे राजकोट किल्यावर भेट द्यायला गेले असताना निलेश राणे आणि नारायण राणे हे दरवाजाजवळ थांबले होते. या ठिकाणी पोलिसांनी राणे पितापुत्रांची समजून काढून आदित्य ठाकरे किल्याच्या बाहेर गेले आहेत.
६. महाविकास आघाडीची मातोश्रीवर पत्रकार बैठक सुरु आहे. या ठिकाणी शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते.