
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मेट्रो ३ च उदघाटन करायला हजर राहणार आहेत. तसेच ते पोहरादेवी येथेही जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
३. अजित पवार गटाचे नेते इंद्रनील नाईक यांनी आपल्याला पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमातून डावललं असल्याचं सांगितलं आहे.
४. हर्षवर्धन पाटील सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर येथे पक्षप्रवेश करणार आहेत.
५. मुख्यमंत्र्यांची भेट न घेता आल्यामुळे आदिवासी मंत्री आणि आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या आहेत.