शनिवार, 24 ऑगस्ट 2024 च्या ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर...

एशियानेट न्यूज पोर्टलवर 24 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

1.पुणे जिल्ह्यातील पौड जवळ खराब हवामानामुळे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच 4 जण असल्याची माहिती आहे, ते यामध्ये जखमी झाले आहेत. त्यातील दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

2.नालासोपार्‍यात 17 वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

3. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले आहे.

4. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले आहे.

5.नाशिकमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने आईला आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

6.बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. निष्कर्षानुसार, मुलींवर गेल्या 15 दिवसांपासून अत्याचार होत होते आणि त्यांच्या गुप्त भागांना गंभीर दुखापत झाली आहे.

7.भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याच जाहीर केले आहे. त्याने समाजमाध्यमावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

8. महाराष्ट्र शासन, पोलीस अशी नाव लिहिलेल्या अनेक गाड्या आसपास दिसत असतात. यावरच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसार संतोष पंडित यांनी आवाज उठवला आहे. 

9. 1 सप्टेंबरपासून नियमांमध्ये बदल केले जाणार असून यामध्ये फेक कॉल बंद, टू व्हीलरवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट, क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरातील बदल यांचा समावेश आहे.

10. पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर तीन जण सुखरूप आहेत.

11. बीसीसीआयचे सचिव जय शाह सचिवपदाचा राजीनामा देणार आहेत. ते लवकरच आयसीसी या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. 

12. जम्मू काश्मीरमध्ये मतदानाच्या तीन टप्प्यांत नवीन सरकार निवडले जाईल. केंद्रशासित प्रदेशातील लोक त्यांचे प्रतिनिधी निवडण्यात मागे राहू नयेत, यासाठी दिल्लीतही मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

Share this article