जिमला करा गुडबाय, घरच्याघरी वजन कमी करण्यासाठी करा 3 योगासने

Yoga for Weight Loss : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातून स्वत:ला तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आणि डाएटचा आधार घेतात. अशातच जिमला न जाता घरच्याघरी वजन कमी करण्यासाठी पुढील काही तीन सोपी योगासने दररोज करू शकता.

Chanda Mandavkar | Published : Jun 19, 2024 7:24 AM IST / Updated: Jun 19 2024, 02:35 PM IST

Yoga for Weight Loss : सध्याच्या बदललेल्या जगात प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार असल्याचे अनेक रिपोर्ट्समधूनही समोर आले आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. खरंतर, बिघडलेली लाइफस्टाइल, चुकीची खाण्यापिण्याची पद्धत आणि तणाव अशा काही कारणांमुळे व्यक्तीचे वजन वाढले जाते.

लठ्ठपणाच्या प्रकणात भारत जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या स्थानावर आहे. जवळजवळ 8 कोटी भारतीय नागरिक लठ्ठपणाचा सामना करतायत. त्यापैकी एक कोटी नागरिक हे 5-19 वयोगटातील आहेत. तुम्ही देखील यापैकीच असाल तर वजन कमी करण्यासाठी कधीही सप्लिमेंटचा आधार घेऊ नका. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशातच जिमलाही न जाता घरच्याघरी काही सोपी योगासने करुन वजन कमी करू शकता.

भुजंगासन
भुजंगासनला कोबरा पोज नावानेही ओखळले जाते. कारण भुजंगासन करताना शरिराचा वरचा भाग उचल्यानंतर सापाच्या फणासारखा दिसतो. अशातच भुजंगासन दररोज केल्याने शरिरातील रक्त पुरवठ्याची प्रक्रिया सुरळीत सुरु राहण्यास मदत होतो. याशिवाय पोट, पाठ आणि खांद्यावरील चरबीही कमी होऊ शकते.

धनुरासन
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही धनुरासन करू शकता. धनुरासन केल्याने हात आणि पायावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. दररोज 10-15 मिनिटे धनुरासन करू शकता.

पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन केल्याने केवळ वजनच नव्हे काही प्रकारच्या आजारांपासून दूर राहता येते. याशिवाय शरिरातील पचनक्रियाही सुरळीत काम करते. पश्चिमोत्तानासन करण्याचा आणखी एक फायदा असा की, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, पाठ आणि पोटाचे स्नायू मजबूत होण्यास फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

डाएटकडे लक्ष द्या
हेल्दी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योगाभ्यासासह डाएटकडेही लक्ष द्यावे. फास्ट फूड, पाकिटबंद पदार्थ, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय घरच्याघरीही तयार केलेले काही तिखट, तेलकट पदार्थ कमी प्रमाणात खावेत. डाएटमध्ये तुम्ही वरण, भात, पालेभाज्या, फळ यांचा समावेश करू शकता. काणर वजन कमी करण्यासाठी डाएट आणि पोर्शन कंट्रोल करणे फार महत्वाचे आहे.

आणखी वाचा : 

हेल्दी आरोग्य आणि बाळासाठी प्रेग्नेंसीमध्ये करता येतील ही 5 सोपी योगासने

Yoga Day 2024 : फुफ्फुसे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज सकाळी करा ही 4 योगासने, रहाल आजारांपासून दूर

Read more Articles on
Share this article