घरात हिटर किंवा ब्लोअरचा वापर केल्याने हवेतला ओलावा कमी होतो आणि त्वचा अधिक कोरडी होते. म्हणून घरात हवा आर्द्र ठेवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर फायदेशीर असतो. आहारात ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन E व C यांचा समावेश करावा. सुका मेवा, बिया, मासे, नारळ, अवोकॅडो, गाजर, पालक, टोमॅटो, पपई, ऑलिव्ह ऑइल यांचा आहारात समावेश त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. दिवसातून पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे; थंडीमुळे तहान कमी लागली तरी शरीराला व त्वचेला हायड्रेशन मिळायला हवा.