पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी सांगितलेय गुपित

बहुतांशजण म्हणतात की, नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये. ही फार जुनी मान्यता आहे. पण नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये याचे गुपित महाभारतातील भीष्म पितामह यांनी सांगितले आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

Chanda Mandavkar | Published : Dec 23, 2023 7:12 AM IST / Updated: Dec 23 2023, 12:51 PM IST

Spiritual : सध्या एकत्रित कुटुंबाऐवजी विभक्त परिवारात राहणे बहुतांश कपल पसंत करतात. कुटुंब व्यवस्थेची व्याख्या काळानुसार बदलत चालली आहे. यापैकीच एक गोष्ट म्हणजे खाण्याच्या सवयीत झालेला बदल. आजकाल बहुतांश परिवारात नवरा-बायको एकाच ताटात जेवतात. यामुळे नवरा-बायकोमधील नातेसंबंध घट्ट होण्यासह त्यांच्यामधील प्रेम वाढले जाते असे मानले जाते.

पण शास्रात नवरा-बायकोने एकाच ताटात जेवणे चुकीचे असल्याचे मानले आहे. याशिवाय महाभारतातील भीष्म पितामह (Bhishma) यांनी देखील याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये?
भीष्म पितामह यांनी आदर्श आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. याचा उल्लेख महाभारतातही (Mahabharat) करण्यात आला आहे. भीष्म पितामह म्हणतात की, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक नातेसंबंध जोडतो. याशिवाय त्या व्यक्तीवर आपल्या घरातील सदस्यांच्या प्रति काही जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्या प्रत्येकाने पार पाडल्या पाहिजेत.

भीष्म सांगतात, नवरा-बायको एकाच तटाच जेवल्याने नवऱ्याचे बायकोवरील प्रेम वाढले जाते. पण तो व्यक्ती घरातील इतर मंडळींकडे दुर्लक्ष करू शकतो. यामुळे घरात भांडण होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. या एका चुकीमुळे संपूर्ण परिवार आणि घरातील आनंद दूर होऊ शकतो हे देखील भीष्म पितामह यांनी सांगितले आहे.

चूक आणि बरोबरमधील फरक कळत नाही
बायकोच्या प्रति अत्याधिक प्रेम असणे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होण्यासारखे असून व्यक्तीला चूक आणि बरोबर काय यामधील फरक कळत नाही. ही गोष्ट घरातील मंडळींना न पटण्यासारखी आहे. यामुळेच नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये. 

पण परिवाराने एकत्रित जेवल्यास परिवारात एकता आणि प्रेम वाढले जाते. याशिवाय एकमेकांसोबतचे नातेसंबंध घट्ट होतात. एकमेकांच्या प्रति आदराची भावनाही वाढली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

जेवताना ही चूक घडणे म्हणजे…
भीष्म पितामह यांनी हे देखील सांगितलेय की, एखाद्याने तुम्ही वाढलेले जेवणाचे ताट ओलांडल्यास ताटातील जेवण मातीसमान दूषित मानले जाते. हे जेवण जनावरांना द्यावे. याशिवाय एखाद्याचा पाय जेवणाच्या ताटावर पडल्यास त्या ताटाला नमस्कार करून ते जेवण फेकून द्यावे. हे जेवण घरात दारिद्र आणते. तसेच जेवणात केस आढळल्यास ते जेवणही खाऊ नये. यामुळे घरातील धनाची हानि होते.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Health: मूळव्याधाचा त्रास होतोय? हे फूड्स खाणे टाळा अन्यथा...

Heart Attack : खरंच या वेळेस जेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो? जाणून घ्या

12/31/23 : यंदाच्या वर्षातील शेवटचा दिवस तुमच्यासाठी या कारणास्तव आहे खास

Share this article