Why Liquor Bottles Are 750ml: दारूची बाटली नेहमी 750 मिलीच का असते? कारण वाचून थक्क व्हाल!

Published : Oct 06, 2025, 09:56 PM IST

Why Liquor Bottles Are 750ml: मद्याच्या बाटलीचे 750 मिली माप हे 18व्या शतकातील फ्रेंच व्यापाऱ्यांनी व्यापारातील सुलभतेसाठी सुरू केले. एका बॅरलमध्ये 300 बाटल्या बसवण्यासाठी हे प्रमाण निश्चित करण्यात आले, जे पुढे ग्राहकांच्या सोयीमुळे जागतिक मानक बनले.

PREV
18
मद्याच्या (दारूच्या) बाटलीत नेहमी 750 मिलीटरच दारू का असते?

तुम्ही कधी विचार केला आहे का, की मद्याच्या (दारूच्या) बाटलीत नेहमी 750 मिलीटरच दारू का असते? जगभरात कुठेही गेलात तरी हे माप बदलत नाही. मग त्यामागचं कारण नक्की काय? 

28
इतिहासात डोकावून पाहूया...

18व्या-19व्या शतकात ब्रिटन आणि फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर मद्याचा व्यापार चालत असे. पण मोठी अडचण म्हणजे, दोन्ही देशांमध्ये दारू मोजण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या ब्रिटनमध्ये गॅलनमध्ये मोजत तर फ्रान्समध्ये इतर मोजमाप वापरलं जात होतं. 

38
फ्रान्सने शोधली युक्ती

फ्रान्समध्ये बॅरलप्रमाणे मद्य विकण्याची प्रणाली सुरू झाली. व्यापाऱ्यांनी असा हिशेब लावला की, एका बॅरलमध्ये अचूक 300 बाटल्या बसतील, जर त्या प्रत्येक 750 मिलीच्या असतील. यामुळे एकसंध प्रमाण तयार झालं, आणि व्यापार सुलभ झाला. 

48
व्यापाऱ्यांचं गणित सोपं

750 मिलीच्या बाटल्या वापरल्यामुळे व्यापाऱ्यांना लिटर किंवा गॅलनमध्ये मोजावं लागत नव्हतं – फक्त बाटल्या मोजून काम होत होतं. त्यामुळे या सिस्टिमला मोठा प्रतिसाद मिळाला. 

58
पार्टीसाठी परफेक्ट साईज!

750 मिली दारूपासून साधारण 5-6 ग्लास बनतात (प्रत्येकी 125-150 मिली). ही मात्रा एखाद्या छोटी पार्टी किंवा गेटटुगेदरसाठी अगदी परफेक्ट मानली गेली. त्यामुळे ग्राहकांमध्ये ही साईज फारच लोकप्रिय झाली. 

68
जागतिक मान्यता

20व्या शतकात युरोप आणि अमेरिकेनेही या साईजला अधिकृत मानक म्हणून स्वीकारलं. कारण एकसमान प्रमाण म्हणजे अधिक सोपा व्यापार, नियंत्रण आणि उत्पादन. 

78
आजही ही परंपरा जिवंत

आजही जगभरात दारूची बहुतांश बाटली 750 मिलीच असते. ही केवळ परंपरा नाही, तर एक जागतिक उद्योगात मान्यता प्राप्त माप आहे. 

88
परिपूर्ण सांगड 750 मिलीची बाटली

तर, 750 मिलीचं माप केवळ ऐवजी एवढंच की, व्यापारात सुलभता, ग्राहकांची गरज आणि आंतरराष्ट्रीय मान्यता या सगळ्यांची परिपूर्ण सांगड आहे ही एक बाटली.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories