लेझच्या पाकिटात निम्मी हवा का असते? आत हवा नाही तर...

Published : Oct 03, 2026, 09:15 AM IST

तुम्ही कधी विचार केलाय का? दुकानातून लेझ (Lay's) किंवा कोणतंही चिप्सचं पाकीट आणलं, की ते निम्मं रिकामंच असतं. कंपन्या पाकीटभर चिप्स का देत नाहीत आणि एवढी रिकामी जागा का सोडतात? यामागे एक खास कारण आहे.

PREV
14
लेझ (Lay's)

दुकानातून लेझ (Lay's) किंवा कोणतंही चिप्सचं पाकीट विकत घेतल्यावर ते निम्मं रिकामं असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. कंपन्या पाकिटात पूर्ण चिप्स का भरत नाहीत? यामागे एक खूप रंजक वैज्ञानिक कारण आहे.

24
पाकिटात साधी हवा नसते!

चिप्सच्या पाकिटांमध्ये साधी हवा किंवा ऑक्सिजन भरलेला नसतो. त्याऐवजी कंपन्या त्यात नायट्रोजन (Nitrogen) गॅस भरतात. नायट्रोजन हा गॅस सहसा इतर घटकांसोबत लगेच रिअॅक्ट होत नाही. त्यामुळे चिप्सचा दर्जा चांगला राहतो.

34
ऑक्सिजन असला तर काय होईल?

चिप्स तळण्यासाठी तेलाचा वापर होतो. जर पाकिटात ऑक्सिजन असेल, तर तेलाचं ऑक्सिडेशन (Oxidation) होतं. यामुळे चिप्सची चव आणि वास दोन्ही बिघडू शकतं. म्हणूनच कंपन्या पाकिटातील ऑक्सिजन काढून त्यात नायट्रोजन भरतात.

44
चिप्स फ्रेश ठेवण्यात नायट्रोजनचा रोल

पाकिटातील नायट्रोजन गॅस चिप्ससाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करतो. यामुळे चिप्स ताजे, कुरकुरीत आणि चविष्ट राहतात. शिवाय, ट्रान्सपोर्ट करताना पाकिटात गॅस असल्यामुळे चिप्सचा चुरा होत नाही. म्हणजेच, कंपन्या फक्त चिप्स कमी देण्यासाठी पाकीट रिकामं ठेवत नाहीत, तर चिप्स सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात नायट्रोजन भरतात.

Read more Photos on

Recommended Stories