वॉशिंग मशीनमध्ये शूज धुतल्याने ते अगदी नव्यासारखे दिसू शकतात. पण त्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. शूज धुण्यापूर्वी केअर इन्स्ट्रक्शन्स नक्की वाचा. लेस आणि धूळ काढा, मशीनमध्ये कोल्ड-वॉटर सायकल वापरा आणि शूज हवेत चांगले वाळू द्या.
स्नीकर्स खूप लवकर जुने दिसू लागतात. तुम्ही रोज एकच शूज घालत असाल, तर त्यावर धूळ, चिखल आणि डाग साचतात. ओल्या कपड्याने शूजवरची थोडीफार धूळ निघेल, पण जास्त घाण झालेले शूज स्वच्छ करण्यासाठी डीप क्लिनिंगची गरज असते.
तुमचे आवडते शूज वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यापूर्वी काही गोष्टी तपासणं महत्त्वाचं आहे. काही प्रकारचे शूज मशीनमध्ये धुता येत नाहीत. चुकीच्या तापमानावर शूज धुतल्यास किंवा वाळवल्यास त्यांचं कापड, आकार किंवा गम खराब होऊ शकतो.
25
पहिली स्टेप: तुमचे शूज मशीनमध्ये धुता येतील का ते तपासा
तुमच्या शूजवर जर मशीन वॉशचा टॅग असेल, तर या सोप्या पद्धतीने तुम्ही ते सुरक्षितपणे धुवू शकता.
शूजसोबत आलेल्या केअर इन्स्ट्रक्शन्स वाचणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.
कॅनव्हास आणि सिंथेटिक शूज तुम्ही मशीनमध्ये जेंटल सायकलवर धुवू शकता. पण लेदर, स्वेड किंवा इतर नाजूक कापडाचे शूज वेगळ्या पद्धतीने स्वच्छ करावे लागतात.
शूज मजबूत दिसत असले तरी, जर टॅगवर मशीन वॉश करू नका असं लिहिलं असेल, तर ते मशीनमध्ये टाकू नका.
दुसरी स्टेप: शूज धुण्यापूर्वी अशी करा तयारी
आधीच योग्य तयारी केल्यास शूज धुण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी होते.
सर्वात आधी शूजची लेस आणि आतले इन्सोल्स (निघत असतील तर) काढून ठेवा. शूज घराबाहेर नेऊन झटकून घ्या किंवा ब्रशने त्यावरील धूळ, वाळू आणि चिखल काढून टाका. वरची घाण आधीच काढल्यामुळे मशीन खराब होत नाही.
तुम्ही लेस वेगळी धुवू शकता. तसेच, निघणारे इन्सोल्स केअर इन्स्ट्रक्शन्सनुसार पुसून घेऊ शकता. शूज मशीनमध्ये टाकण्यापूर्वी जास्त घाण असलेल्या भागावर मऊ ब्रश फिरवून घ्या.
35
तिसरी स्टेप: जेंटल वॉश सेटिंग निवडा
तयारी झाल्यानंतर शूज वॉशिंग मशीनमध्ये टाका. गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. त्याऐवजी थंड पाण्यासोबत जेंटल किंवा डेलिकेट सायकल निवडा. शूज धुण्यासाठी नेहमी सौम्य डिटर्जंट वापरा.
मशीनमध्ये एकाच वेळी खूप कपडे किंवा शूज टाकू नका. कंपनीच्या सूचनांचे नेहमी पालन करा. शूजसोबत मशीनमध्ये काही मऊ टॉवेल टाकल्यास, ड्रममध्ये शूज आदळण्याचं प्रमाण कमी होतं.
शूज जास्त न घासता आणि गरम पाण्याचा वापर न करता स्वच्छ करणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
शूज धुण्याइतकंच ते योग्य पद्धतीने वाळवणंही महत्त्वाचं आहे. कंपनीने सांगितल्याशिवाय शूज ड्रायरमध्ये वाळवू नका. जास्त उष्णतेमुळे शूजचा आकार बिघडू शकतो आणि त्यातील गम खराब होऊ शकतो.
त्याऐवजी शूज मोकळ्या हवेत आणि सामान्य तापमानावर वाळू द्या. शूजमध्ये पेपर टॉवेल्सचे बोळे करून ठेवा. यामुळे पाणी लवकर शोषलं जातं आणि शूजचा आकारही टिकून राहतो.
शूज थेट उन्हात किंवा उष्णतेजवळ ठेवू नका. ते पूर्णपणे वाळल्यानंतरच पुन्हा वापरा.
55
लक्षात ठेवण्यासारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टी
मशीनमध्ये शूज धुणं सोपं वाटत असलं, तरी सगळेच शूज मशीनमध्ये धुता येत नाहीत. महागडे आणि नाजूक शूज हाताने किंवा कंपनीने सांगितलेल्या पद्धतीनेच स्वच्छ करणं जास्त सुरक्षित असतं.
जर तुम्हाला शूज मशीनमध्ये धुण्याबाबत शंका असेल, तर मऊ ब्रश, सौम्य साबण आणि थोड्या पाण्याचा वापर करून ते हातानेच स्वच्छ करा.
तसेच, मशीनमध्ये हेवी वॉश सायकल आणि खूप गरम पाण्याचा वापर टाळा. यामुळे शूजचं कापड आणि आकार खराब होऊ शकतो.
तुमचे शूज जर मशीन वॉशसाठी योग्य असतील, तरच ते मशीनमध्ये धुवा. सर्वात आधी केअर इन्स्ट्रक्शन्स वाचा, शूजवरची धूळ काढा, थंड पाण्याचा वापर करून जेंटल सायकलवर धुवा आणि मोकळ्या हवेत वाळवा.
योग्य काळजी घेतल्यास तुमचे जुने शूजही अगदी नव्यासारखे चमकू लागतील आणि तुम्हाला नवीन शूजवर पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.