Kids Health : तुमच्या मुलांना चहा-कॉफी देताय? मग हा धोक्याचा इशारा नक्की वाचा

Published : Oct 26, 2026, 09:45 AM IST

तुमच्या मुलांना रोज चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे का? असेल तर ती लगेच बदला. लहान वयात चहा-कॉफी प्यायल्याने मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

PREV
13
मुलांना सकाळी उठल्यावर चहा-कॉफी देता?

सकाळी उठल्याउठल्या एक कप चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. घरातले मोठे लोक चहा पीत असल्याचं बघून मुलांनाही त्याची चव चाखायची असते. काही घरांमध्ये तर पालक स्वतःहून मुलांना चहा-कॉफीची सवय लावतात. पण लहान वयात चहा-कॉफी पिणं मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. कारण, यात 'टॅनिन' (Tannin) नावाचा घटक असतो. हा घटक मुलांच्या शरीराला आवश्यक असलेलं कॅल्शियम आणि लोह (Iron) मिळण्यात अडथळा निर्माण करतो, असं डॉक्टर सांगतात.

23
चहा-कॉफीचे दुष्परिणाम

मुलांनी निरोगी राहावं यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. सकस आहार घेतल्यावरच ही ताकद मिळते. पण, चहा-कॉफी प्यायल्याने मुलांची इम्युनिटी खूप कमी होते. यामुळे पचनाचे आजार सुरू होतात आणि शरीर आतून कमकुवत होतं.

चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या टॅनिनमुळे शरीरात कॅल्शियम आणि लोह शोषलं जात नाही. यामुळे मुलांना ॲनिमिया (रक्तक्षय) होऊ शकतो. हाडं कमकुवत होतात आणि अगदी लहान वयातच सांधेदुखी, हात-पाय दुखण्याचा त्रास सुरू होतो.

33
चहा-कॉफीमधील कॅफेन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक

चहा आणि कॉफीमध्ये 'कॅफीन' (Caffeine) असतं. हे आपल्याला फ्रेश ठेवायला मदत करतं. पण हेच कॅफीन मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान करतं. चहा-कॉफी प्यायल्याने मुलांना झोप न येणं, राग येणं आणि चिडचिड होणं असे मानसिक त्रास सुरू होतात. यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते.

प्रमाणापेक्षा जास्त चहा-कॉफी प्यायल्याने दात किडतात आणि पोटाचे आजारही होतात. मुख्य म्हणजे मुलांची भूक मरते. भूकच लागली नाही तर मुलं नीट जेवत नाहीत. यामुळे ॲसिडिटीचा त्रास वाढतो आणि शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्याने त्यांची वाढ थांबते.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories