Health Care : लाल की पांढरा पेरू? आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशार कोणता? घ्या जाणून

Published : Sep 10, 2025, 04:12 PM IST
Health Care : लाल की पांढरा पेरू? आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशार कोणता? घ्या जाणून

सार

पेरूचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असणाऱ्या पोषण तत्वांचा आरोग्याला फायदा होतो. मात्र लाल पेरू की पांढरा पेरू, यामधील आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर कोणता हे जाणून घेऊया.

पेरू हे सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असलेले फळ आहे. यामध्ये भरपूर पोषकतत्वे असतात. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस ही पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. साधारणपणे पेरूमध्ये दोन प्रकार असतात. एक पांढरा पेरू आणि दुसरा लाल पेरू. या दोघांपैकी कोणता आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे ते आता या पोस्टमध्ये पाहू.

पांढरा पेरू

लाल पेरूपेक्षा पांढऱ्या पेरूची चव वेगळी असते. तसेच पांढऱ्या पेरूमध्येच जास्त प्रमाणात साखर आणि स्टार्च असते. शिवाय लाल पेरूपेक्षा पांढऱ्या पेरूमध्येच जास्त बिया असतात. मुख्य म्हणजे पांढऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते.

आरोग्य फायदे :

- हे आरोग्य सुधारते

- पचनशक्ती सुधारते

- वजन कमी करण्यास मदत करते

- त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर

- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते

- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते

- मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते

- यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत.

लाल पेरू

पांढऱ्या पेरूपेक्षा लाल पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण यामध्ये साखर, व्हिटॅमिन सी, स्टार्च कमी असते. याशिवाय बियाही पांढऱ्या पेरूपेक्षा कमी असतात. लाल पेरू लाल असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले कॅरोटीनॉइड्स.

आरोग्य फायदे

लाल पेरूमध्ये लाइकोपीन जास्त असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर असलेले एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. तसेच हेच हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.

कोणता चांगला?

पांढऱ्या पेरूपेक्षा लाल पेरू चांगला असल्याचे सांगितले जाते. कारण यामध्ये पांढऱ्या पेरूपेक्षा पोषक मूल्ये जास्त असतात. म्हणजेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि ओमेगा 6 फॅटी फॅटी अॅसिड, भरपूर फायबर लाल पेरूमध्ये असतात. मधुमेह रुग्णांसाठी हे एक योग्य फळ मानले जाते. तरीही, लाल पेरू आणि पांढरा पेरू दोन्हीही पौष्टिक आणि आरोग्यदायी असल्याने, तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गरजेनुसार तुम्ही कोणता पेरू खायचा ते निवडा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सुनेला गिफ्ट द्यायला मार्केटमध्ये आल्या सुंदर बांगड्या, डिझाईन पाहूनच पडाल प्रेमात
हिवाळ्यात शून्य मिनिटात पटकन करा गरम, तिळाचे लाडू खाऊन व्हा ताजेतवाने