सकाळी घराबाहेर पडल्यावर वाजते थंडी, हे उपाय केल्यावर अंगात तयार होईल उब; दिवसभर राहाल गरम

Published : Nov 19, 2025, 05:00 PM IST

थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांचे लेयरिंग करणे, गरम पेये पिणे आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच, डोके, कान, मान आणि पाय उबदार ठेवल्याने व त्वचेला मॉइश्चरायझ केल्याने थंडीचा प्रभाव कमी होतो.

PREV
16
सकाळी घराबाहेर पडल्यावर वाजते थंडी, हे उपाय केल्यावर अंगात तयार होईल उब; दिवसभर राहाल गरम

थंडी टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लेयरिंग, अगदी हलके पण जास्त कपडेवापरणे . याने शरीरातील उष्णता बाहेर जात नाही आणि दिवसभर उबदार वाटतं. जॅकेट, स्वेटर, थर्मल, हूडी हे कपड्यांचे कॉम्बिनेशन सर्वोत्तम असतं.

26
घराबाहेर पडण्याआधी गरम पाण्याचा वापर करा

चेहरा, हात आणि मान गरम पाण्याने धुतल्याने शरीराचा तापमान संतुलित राहतो. यामुळे थंड हवेत शरीराला एकदम धक्का बसत नाही. विशेषतः खूप थंडी असेल तेव्हा हा उपाय खूप उपयुक्त आहे. 

36
गरम चहा, कॉफी किंवा गरम पाणी प्या

सकाळी एक कप गरम पेय शरीराला आतून उब देतं. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि थंडी वाजण्याची शक्यता कमी होते.ब्रेकफास्टपूर्वी गरम पाणी पिण्याने शरीर गरम होतं.

46
डोकं, कान आणि मान झाका

थंडी सर्वाधिक डोक्यामुळे शरीरात शिरते. म्हणून कॅप, बीनी, मफलर किंवा स्कार्फ वापरणं अत्यंत आवश्यक आहे. मान झाकल्याने थंडी शरीरात उतरत नाही आणि श्वसनाचा त्रासही होत नाही. सकाळी बाहेर पडताना हे तीनही झाकणं चांगलं आहे.

56
पाय गरम ठेवण्यासाठी योग्य फूटवेअर

पाय थंड झाले की संपूर्ण शरीर थंड होतं, हा सर्वात मोठा धोक्याचा भाग आहे. म्हणून जाड सोल असलेले शूज, थर्मल मोजे किंवा वूलन सॉक्स वापरा. थंड जमिनीतून येणारी थंडी याने पूर्णपणे रोखता येते.

66
मॉइश्चरायझर किंवा तेल वापरा

थंडीमुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे शरीराला अधिक थंडी जाणवते. स्किनला संरक्षण देण्यासाठी मॉइश्चरायझर, नारळ तेल किंवा व्हॅसलिन वापरा. हा छोटा उपाय शरीरातील उष्णता जपतो.

Read more Photos on

Recommended Stories