ताप आला, अशक्तपणा जाणवला किंवा एखादं ऑपरेशन झालं की डॉक्टर लगेच सलाईन लावतात. सलाईन लावलं की भूकही लागत नाही आणि अशक्तपणाही बऱ्याच अंशी कमी होतो. पण या सलाईनच्या बाटलीत नेमकं कोणतं पाणी असतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
रुग्णालयात गेल्यावर अनेक रुग्णांना सलाईन लावल्याचं तुम्ही पाहिलं असेल. शरीरात अशक्तपणा आल्यावर, पाण्याची पातळी कमी झाल्यावर किंवा काही आजारांमध्ये डॉक्टर सलाईन लावण्याचा निर्णय घेतात. पण या बाटलीत नेमकं काय असतं आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो, असे प्रश्न अनेकांना पडतात.
23
सलाईनच्या बाटलीत काय असतं?
सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या नॉर्मल सलाईनमध्ये शुद्ध पाण्यासोबत सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ असतं. एका लिटर पाण्यात साधारण ९ ग्रॅम मीठ मिसळून हे तयार करतात. यातील मिठाचं प्रमाण आपल्या रक्तातील द्रवाइतकंच असतं. त्यामुळे शरीरातील पेशींवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. रुग्णाच्या गरजेनुसार डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे द्रवही देतात.
33
सलाईन कसं काम करतं?
शिरेवाटे सलाईन शरीरात सोडल्यावर पाण्याची कमतरता भरून निघते. तसेच शरीरातील पाणी आणि सोडियमची पातळी योग्य राहण्यास मदत होते. उलट्या, जुलाब किंवा जास्त घाम आल्याने शरीरातील पाणी कमी झाल्यावर डॉक्टर सलाईन लावतात. पण प्रत्येक अशक्तपणावर सलाईन हाच उपाय नसतो. रुग्णाची स्थिती पाहूनच डॉक्टर निर्णय घेतात. विनाकारण सलाईन घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.