पैसे तर सगळेच कमवतात. पण प्रत्येक जण श्रीमंत का होत नाही? अनेक लोक आयुष्यभर गरीबच का राहतात? श्रीमंत आणि गरीब लोकांच्या विचारसरणीत नेमका काय फरक असतो? यावर आचार्य चाणक्य काय सांगतात?
पैसे कमवणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते हुशारीने मॅनेज करणेही गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे कमी पगार असूनही आनंदाने जगतात आणि संपत्तीही उभी करतात. दुसरीकडे, जास्त पगार असूनही काहींच्या हातात महिन्याशेवटी एक रुपयाही उरत नाही. याला फक्त उत्पन्न नाही, तर आपली विचारसरणी, खर्च आणि भविष्याचं प्लॅनिंग कारणीभूत असतं. उत्पन्नाचा विचार न करता श्रीमंत व्हायचं असेल, तर चाणक्यांनी सांगितलेले हे नियम तुम्ही फॉलो करायलाच हवेत.
23
अडचणी आल्यावर काय करावे?
आयुष्यात प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही त्याकडे कसे बघता, यावर सगळं अवलंबून असतं. अपयश आल्यावर अनेक लोक परिस्थितीला दोष देतात. पण जे लोक रडत न बसता समस्येवर उपाय शोधतात, तेच आयुष्यात यशस्वी होतात. पैशांच्या बाबतीतही हेच नियम लागू होतात. आर्थिक अडचण आल्यास खचून न जाता मार्ग शोधायला हवा. तसेच, नुसते पैसे कमवून चालत नाही, तर बचतही महत्त्वाची आहे. बजेट बनवून गरजेच्या गोष्टींवरच खर्च करा. दर महिन्याला थोडी का होईना, पण बचत करण्याची सवय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते.
33
इतरांचा हेवा करू नका..
इतरांची प्रगती पाहून जळफळाट करणे किंवा स्वतःला कमी लेखणे यामुळे तुमचीच मानसिक शांतता बिघडते. त्यापेक्षा त्यांच्या यशामागची मेहनत आणि हुशारी यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. रातोरात कोणीही श्रीमंत होत नाही. घाईघाईत घेतलेले निर्णय नेहमी नुकसान करतात. त्यामुळे आर्थिक बाबतीत संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. तसेच, माणसाकडून चुका या होतातच. पण चूक झाल्यावर इतरांवर खापर फोडण्यापेक्षा ती मान्य करा. स्वतःच्या चुकांमधून शिकणारा माणूसच भविष्यात अधिक खंबीर आणि यशस्वी होतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.