Dating Down Trend: "तुझ्यापेक्षा चांगला मिळाला असता" - या अहंकारामुळेच नाती तुटतायत! Gen Z चा नवा ट्रेंड

vivek panmand   | CMS
Published : Nov 05, 2026, 04:45 PM IST
Dating Down Trend: "तुझ्यापेक्षा चांगला मिळाला असता" - या अहंकारामुळेच नाती तुटतायत! Gen Z चा नवा ट्रेंड

सार

"मला तुझ्यापेक्षा खूप चांगला जोडीदार मिळाला असता" - हे एक वाक्य आजकाल अनेक नाती उद्ध्वस्त करत आहे. यातूनच 'डेटिंग डाऊन' हा नवा ट्रेंड सुरू झालाय. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, या ट्रेंडमध्ये एक धोकादायक रँकिंग सिस्टीम लपलेली आहे, जी प्रेमाला स्पर्धेत बदलते. हा ट्रेंड नेमका काय आहे आणि तो इतका घातक का आहे?

Relationship Advice: इन्स्टाग्राम, रेडिट आणि थ्रेड्सवर सध्या 'Dating Down' या शब्दाची खूप चर्चा आहे. पण याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक स्वतःपेक्षा 'कमी योग्य' वाटणाऱ्या व्यक्तीला डेट करते, तेव्हा त्याला Dating Down म्हणतात. ही योग्यता शिक्षण, नोकरी, पैसा, रूप किंवा सोशल स्टेटस (Relationship Advice) यापैकी काहीही असू शकते. उदाहरणार्थ, एखादा उच्चशिक्षित, चांगल्या नोकरीवर असलेला मुलगा किंवा मुलगी जर अशा व्यक्तीला निवडत असेल जो करिअर किंवा शिक्षणात त्यांच्यापेक्षा मागे आहे, तेव्हा समाज किंवा मित्र म्हणतात, "तो/ती तर Dating Down करत आहे." आणि याच्या अगदी उलट म्हणजे Dating Up.

हा ट्रेंड का वाढतोय?

१. नियंत्रण ठेवण्याची मानसिकता: अनेकांना वाटतं की कमी यशस्वी जोडीदारावर सहज नियंत्रण ठेवता येईल, तो जास्त महत्त्व देईल आणि सोडून जाणार नाही. २. 'मीच भारी' हा अहंकार: "मला तुझ्यापेक्षा खूप चांगला जोडीदार मिळाला असता" - या मानसिकतेमुळे अनेक जण नात्यात स्वतःला नेहमी वरचढ ठेवण्याचा प्रयत्न करतात. जोडीदाराला कमी लेखून स्वतःचा आत्मविश्वास वाढवतात. ३. कमी दडपण: स्वतःच्या बरोबरीच्या व्यक्तीला डेट केल्यास नेहमी स्वतःला सिद्ध करण्याचं दडपण असतं. पण Dating Down मध्ये हे दडपण नसतं.

मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात? हे विषारी का आहे?

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, 'डेटिंग डाऊन' हा शब्दच मुळात समस्येचं मूळ आहे.

हा शब्द प्रेमाला एक रँकिंग किंवा मार्कशीट बनवतो. जिथे माणसांना १० पैकी ८ किंवा १० पैकी ५ असे गुण देऊन पारखलं जातं. जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्ही 'डाऊन' डेट करत आहात, तेव्हाच तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर करणं सोडून देता.

याचे परिणाम काय होतात?

- नात्यात नेहमी एकाला वाटतं की आपण 'उपकार' करत आहोत. - भांडण झालं की लगेच वाक्य येतं, "तुझ्यासाठी मी किती गोष्टी सोडल्या आहेत". - ज्या जोडीदाराला 'कमी' समजलं जातं, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो.

खरं तर निरोगी नातं कधीच अप किंवा डाऊन नसतं. नातं हे बरोबरीचं असतं, जिथे दोघेही एकमेकांच्या उणिवा आणि बलस्थानांचा आदर करतात.

जर तुम्ही मनातल्या मनात तुमच्या जोडीदाराला तुमच्यापेक्षा कमी योग्य समजत असाल, तर तुम्ही प्रेम करत नाही आहात, तुम्ही फक्त स्वतःच्या अहंकारावर प्रेम करत आहात.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Fiber Rich Foods : फायबरयुक्त आहार न घेतल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
Virat Kohli Fitness : दिवसातून 3 वेळा एकच जेवण, उकडलेला आहार; कोहलीच्या फिटनेसचं रहस्य