उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान प्रचंड वाढतंय. काही भागांमध्ये ४० अंशांच्या पुढे पारा गेला आहे. अशा उष्ण हवामानात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं, की डोकेदुखी, चक्कर, थकवा, चिडचिडेपणा आणि डिहायड्रेशनसारखे त्रास सुरू होतात. त्यामुळेच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणं आणि योग्य आहार घेणं आवश्यक ठरतं.
29
पाणी भरपूर प्या
दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. घामाने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते भरून काढणं आवश्यक असतं.
39
नारळपाणी, ताक, लस्सी:
हे पेय नैसर्गिक थंडावा देतात. डिहायड्रेशनपासून वाचवतात आणि पचनक्रियेला मदत करतात.