मोड आलेले कडधान्य खाल्यावर शरीराला कोणता फायदा होतो?

मोड आलेली कडधान्ये पचनासाठी हलकी, प्रथिनांनी समृद्ध आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नियमित सेवनाने पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर.

बदलत्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पचनासाठी हलकी, प्रथिनांनी समृद्ध आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असलेली ही कडधान्ये नियमित आहारात समाविष्ट केल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते.

डायटिशियन प्रियांका पाटील सांगतात, "मोड आलेल्या हरभऱ्याच्या सेवनाने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतात."

या प्रकारे खाल्ल्यास अधिक फायदा: 

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, रोजच्या आहारात मोड आलेली कडधान्ये समाविष्ट केल्याने शरीर निरोगी राहते. त्यामुळे निरोगी आयुष्याच्या दिशेने एक पाऊल टाका आणि मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा! 

Share this article