बाथरूममधले नळ गंजून खराब झालेत का? नवीन नळ बसवण्याआधी ही सोपी ट्रिक नक्की पाहा. किचनमधल्या फक्त तीन वस्तू वापरून जुन्या नळाला पुन्हा नव्यासारखं चमकवणारी ही व्हायरल आयडिया एकदा बघाच!
बाथरूम किंवा किचनमधील पाण्याचे नळ जुने झाल्यावर किंवा पाण्यातील क्षारांमुळे गंजतात. एकदा का नळांवर तपकिरी रंगाचा गंज चढला की ते खराब दिसतात. अनेकजण हे गंजलेले नळ साफ करणं कठीण मानून थेट नवीन नळ बसवतात. पण आता त्याची गरज नाही!
25
फक्त ५ मिनिटांत नळ होतील चकचकीत
गंजलेल्या नळांना फक्त दोन मिनिटांत, दुकानातून नुकत्याच आणलेल्या नवीन नळाप्रमाणे चकचकीत करणारा एक जबरदस्त घरगुती उपाय सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
35
हट्टी गंज काढण्यासाठी
इन्स्टाग्रामवरील 'रुपाली कुकरेती डायरीज' (Rupali Kukreti Diaries) नावाच्या पेजवर ही उपयोगी ट्रिक शेअर करण्यात आली आहे. याला नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. यात फक्त किचनमधील तीन वस्तू वापरून हट्टी गंज कसा काढायचा हे दाखवलं आहे.
*एका लहान भांड्यात थोडं मीठ (Salt), बेकिंग सोडा (Baking Soda) आणि व्हिनेगर (Vinegar) घेऊन चांगलं एकत्र करा. (हे पदार्थ एकत्र केल्यावर फेस तयार होईल).
*आता एक जुना टूथब्रश (Toothbrush) घ्या आणि या जादुई मिश्रणात बुडवा. त्यानंतर नळावर जिथे कुठे गंज, डाग किंवा क्षारांचे थर आहेत, तिथे चांगलं घासा (स्क्रब करा).
*घासल्यानंतर फक्त २ मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या.
55
घरी नक्की ट्राय करून बघा!
कितीही जुना आणि गंजलेला नळ असला तरी, तो शोरूममधून नुकताच आणून बसवल्यासारखा चमकेल. कोणताही पैसा खर्च न करता आणि नळ बदलण्याच्या त्रासाशिवाय हे काम होईल. तुम्हीही हा सोपा उपाय घरी एकदा नक्की करून पाहा!