Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!

Published : Jun 08, 2026, 02:35 PM IST
laptop

सार

Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना कोणती दिशा सर्वात शुभ मानली जाते? बेडवर बसून लॅपटॉप चालवल्याने करिअरचं नुकसान होऊ शकतं का? वास्तुशास्त्रानुसार, लॅपटॉपसमोर खिडकी किंवा दरवाजा असणं योग्य का मानलं जात नाही? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Laptop Wallpaper Vastu: आजच्या काळात अनेकजण घरबसल्या लॅपटॉपच्या मदतीने आपलं काम पूर्ण करतात. खरं तर, नोकरी, व्यवसाय आणि अभ्यासासाठी लॅपटॉप हा एक अविभाज्य भाग बनला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पण लॅपटॉपवर काम करताना वास्तुशास्त्राचे काही नियम पाळणंही महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमच्या करिअरवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया लॅपटॉपवर काम करताना कोणत्या ५ गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

कोणत्या दिशेला बसून लॅपटॉपवर काम करावं?

वास्तु तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉपवर काम करताना तुमचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं. या दिशेला बसून काम केल्याने सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) मिळते आणि मन एकाग्र होतं. याउलट, दक्षिण दिशेला तोंड करून जास्त वेळ काम करू नये. यामुळे कामात मन लागत नाही.

बेडवर बसून लॅपटॉप चालवू नका

अनेकजण आपल्या सोयीनुसार बेडवर बसून तासनतास लॅपटॉपवर काम करतात, पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. वास्तुशास्त्रानुसार, बेडवर बसून काम करणं योग्य नाही. यामुळे तुमची ऊर्जा कमी होते आणि कामाच्या कामगिरीवरही (Work Performance) वाईट परिणाम होतो.

अस्ताव्यस्त डेस्कवर काम करणं

जर तुम्ही डेस्कवर लॅपटॉप ठेवून काम करत असाल, तर डेस्कवर अनावश्यक वस्तू ठेवलेल्या नाहीत याची खात्री करा. अस्ताव्यस्त टेबलमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मानलं जातं. स्वच्छ आणि टापटीप कामाची जागा मन शांत ठेवते आणि कामात लक्ष केंद्रित करण्यास (Focus) मदत करते.

लॅपटॉपसमोर खिडकी-दरवाजा नसावा

वास्तुशास्त्रानुसार, लॅपटॉपवर काम करताना समोर उघडा दरवाजा किंवा मोठी खिडकी नसावी. यामुळे मन कामावरून सारखं विचलित होतं आणि फोकस कमी होतो. शक्यतो काम करताना समोर भिंत असेल तर उत्तम. यामुळे कामात मन लागून राहतं.

लॅपटॉपवर लावा खास वॉलपेपर

लॅपटॉपचा वॉलपेपरही खूप महत्त्वाचा असतो. तुमचा वॉलपेपर सुंदर आणि मनमोहक असावा किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर धार्मिक वॉलपेपरही लावू शकता. लॅपटॉपमध्ये अनावश्यक गोष्टी ठेवू नका. जर लॅपटॉपची स्क्रीन तुटलेली असेल, तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा किंवा बदला.


Disclaimer
या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिष्यांकडून घेतली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणूनच विचारात घ्यावं.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Home Pedicure : पार्लरला जाण्याचं टेन्शन खतम! ३० सेकंदात पुन्हा येईल पायांना चमक
Horoscope 8th June 2026 : मूसल आणि विषकुंभ योग या राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ; वाचा आजचं राशीभविष्य