Vastu Tips: घरात सतत भांडणं होतात? किचनमधल्या 'या' ३ गोष्टींनी नकारात्मकता होईल दूर!

Published : Sep 06, 2026, 01:07 PM IST
Vastu Tips: घरात सतत भांडणं होतात? किचनमधल्या 'या' ३ गोष्टींनी नकारात्मकता होईल दूर!

सार

घरात सगळं काही ठीक असूनही सतत अशांती, आजारपण आणि भांडणं होत आहेत का? वास्तुशास्त्रानुसार, याचं कारण तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं.

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घराच्या सुख-समृद्धीचा आणि आर्थिक स्थितीचा थेट संबंध स्वयंपाकघराशी असतो. स्वयंपाकघरात वास्तुदोष असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. पण काळजी करू नका, यासाठी कोणतीही तोडफोड करण्याची गरज नाही. तुमच्या किचनमध्ये असलेल्या फक्त ३ गोष्टी वापरून तुम्ही घरातील नकारात्मकता दूर करू शकता.

१. मीठ - नकारात्मक ऊर्जेचा शत्रू

वास्तुशास्त्रानुसार, मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

काय करायचं: एका काचेच्या वाटीत थोडं समुद्री मीठ किंवा खडे मीठ घेऊन ती वाटी किचनच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) कोपऱ्यात ठेवा. दर शुक्रवारी हे मीठ बदला. याशिवाय, आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाका. असं मानलं जातं की, यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आजारपणं कमी होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मीठ कधीही स्टीलच्या भांड्यात ठेवू नका.

२. हळद - शुभ शक्तीचं प्रतीक

हळदीला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानलं जातं. हळद ही बृहस्पती ग्रहाचं प्रतीक आहे, जो घरात सुख-समृद्धी घेऊन येतो.

काय करायचं: किचनमधला हळदीचा डबा कधीही रिकामा होऊ देऊ नका. रोज सकाळी स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी गॅस किंवा शेगडीजवळ थोडं हळदीचं पाणी शिंपडा. यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, असं म्हणतात. एका छोट्याशा पुरचुंडीत हळदीचे ५ अख्खे तुकडे (गाठे) बांधून किचनच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) कोपऱ्यात लटकवल्यास कुटुंबात शांतता टिकून राहते.

३. कापूर आणि लवंग - त्वरित परिणामासाठी

घरात जर वारंवार भांडणं आणि अशांती होत असेल, तर हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो.

काय करायचं: संध्याकाळी किचनमध्ये एका स्टीलच्या वाटीत २ कापराच्या वड्या आणि २ लवंगा एकत्र जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात पसरू द्या. कापराच्या सुगंधाने वास्तुदोष नाहीसा होतो आणि लवंगेच्या धुरामुळे नकारात्मक शक्ती घराबाहेर जाते. हा उपाय केल्याने घरातील वातावरण लगेच हलकं आणि सकारात्मक होतं.

हे छोटे छोटे वास्तू नियम पाळल्यास तुमच्या घरात शांतता परत येईल आणि विनाकारण होणारी भांडणं बऱ्याच प्रमाणात कमी होतील, हे नक्की.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Radhika Merchant Watch : राधिकाच्या घड्याळाच्या किंमतीत येईल आलिशान बंगला, किंमत ऐकून व्हाल थक्क
Tender Coconut : जास्त पाणी आणि गोड मलाईवाला नारळ कसा ओळखायचा?