Gardening Tips : तांदळाचं पाणी फेकून देताय? थांबा! या ५ झाडांसाठी हे आहे पॉवर टॉनिक

Published : Jul 11, 2026, 03:02 PM IST

तुम्ही धुतलेल्या तांदळाचे पाणी फेकून देता का? बागकाम तज्ज्ञांची ही सोपी ट्रिक जाणून घेतल्यावर तुम्ही असं करणार नाही. चला जाणून घेऊया, कोणत्या ५ झाडांसाठी तांदळाचं पाणी पॉवर टॉनिकसारखं काम करत.

PREV
16
तांदळाच्या पाण्याचा फायदा

तुम्ही रोज तांदूळ धुतल्यानंतर किंवा उकळल्यानंतर त्याचं पाणी फेकून देत असाल, तर आता असं करण्यापूर्वी दोनदा विचार करा. तांदळाचं पाणी अनेक झाडांसाठी नैसर्गिक न्यूट्रिएंट बूस्टर म्हणून काम करतं. यात स्टार्च, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म पोषक तत्वं असतात. हे घटक झाडांची वाढ, मुळांची मजबुती आणि पानांची हिरवळ वाढवण्यासाठी मदत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी मीठ आणि मसाले नसलेल्या तांदळाचंच पाणी वापरा. तेही मर्यादित प्रमाणातच वापरणं चांगलं. चला तर मग, जाणून घेऊया की कोणत्या ५ झाडांसाठी तांदळाचं पाणी पॉवर टॉनिकपेक्षा कमी नाही.

26
स्नेक प्लांटसाठी आहे न्यूट्रिएंट बूस्ट

स्नेक प्लांटला तशी कमी काळजी घ्यावी लागते, पण अधूनमधून तांदळाचं पाणी दिल्यास त्याला चांगलं पोषण मिळू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की, या झाडाच्या कुंडीतील माती पूर्ण सुकल्यावरच पाणी द्या. कारण जास्त ओलावा या झाडासाठी नुकसानदायक ठरू शकतो.

36
स्पायडर प्लांटची हिरवळ वाढवण्यासाठी फायदेशीर

स्पायडर प्लांट हे घरात वेगाने वाढणारं झाड आहे. तांदळाचं पाणी याच्या पानांचा ताजेपणा टिकवून ठेवतं आणि नवीन वाढीसाठी मदत करतं. नेहमी थंड आणि मीठ नसलेलंच पाणी वापरा.

46
मनी प्लांटसाठी फायदेशीर

मनी प्लांटला हिरवंगार ठेवण्यासाठी आणि त्याची वाढ वेगाने होण्यासाठी महिन्यातून एकदा किंवा दोनदा थोडं पातळ केलेलं तांदळाचं पाणी देऊ शकता. यामुळे झाडाला अतिरिक्त पोषण मिळतं आणि नवीन वेल व पानं वेगाने फुटायला मदत होते. याचा जास्त वापर टाळा, नाहीतर मातीत बुरशी लागू शकते.

56
गुलाबाचं झाड फुलांनी बहरेल

गुलाबाच्या झाडांना वेळोवेळी पातळ केलेलं तांदळाचं पाणी दिल्यास मातीचा दर्जा चांगला राहतो. निरोगी मुळं झाडाला मजबूत बनवतात, ज्यामुळे फुलांची संख्या वाढते.

66
तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी मदत

तुळशीच्या रोपाला मर्यादित प्रमाणात तांदळाचं पाणी दिल्यास मातीतील पोषक तत्वं वाढतात. यामुळे रोप हेल्दी दिसतं आणि नवीन पानांची वाढ चांगली होते. आठवड्यातून एकदा पेक्षा जास्त याचा वापर करू नये.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories