Glowing Skin Care Routine : तुम्हालाही नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा हवी आहे का? याचं रहस्य महागड्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये नाही, तर तुमच्या झोपण्यापूर्वीच्या सवयींमध्ये दडलेलं आहे.
आपल्यापैकी अनेक जण महागड्या क्रीम्स आणि सलॉनमध्ये जाऊन चमकदार त्वचेचा प्रयत्न करतात. पण तज्ज्ञांच्या मते, खरी चमक आतून येते. रात्री झोपण्यापूर्वी काही सोप्या सवयी लावल्यास तुमच्या त्वचेचा ग्लो नक्कीच वाढू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया काय करायला हवं.
26
चेहरा स्वच्छ करणं खूप गरजेचं
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. दिवसभरातील प्रदूषण, धूळ आणि मेकअपमुळे त्वचेची छिद्रं बंद होतात. जर तुम्ही चेहरा स्वच्छ केला नाही, तर पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स येऊ शकतात. तज्ज्ञ रात्रीच्या वेळी सौम्य फेसवॉश वापरण्याचा सल्ला देतात. यामुळे झोपेत तुमची त्वचा स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्त करते.
36
पुरेसे पाणी प्या
आपण दिवसभर पाणी पितो, पण रात्री विसरतो. झोपण्याच्या एक तास आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. शरीरात पुरेसा ओलावा असेल, तर त्वचा कोरडी पडत नाही. तज्ज्ञांच्या मते, डिहायड्रेशनमुळे त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसते. त्यामुळे रात्रीही शरीराला आवश्यक तेवढं पाणी द्या.
झोपेत असताना आपली त्वचा स्वतःला दुरुस्त करण्याचं काम करते. तुम्ही तिला पुरेसा ओलावा देऊन मदत करू शकता. तज्ज्ञांच्या मते, जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणं महत्त्वाचं आहे. यामुळे सकाळी तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल. फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रोडक्ट निवडा.
56
स्क्रिनपासून दूर राहा
आजकाल आपण झोपेपर्यंत मोबाईलला चिकटून असतो. पण या स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिन (झोपेचं हॉर्मोन) तयार होण्यात अडथळा आणतो. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता बिघडते. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात आणि चेहरा थकलेला दिसतो. म्हणूनच तज्ज्ञ झोपण्याच्या ३० ते ६० मिनिटं आधी फोन, टीव्ही आणि लॅपटॉप दूर ठेवण्याचा सल्ला देतात.
66
पुरेशी झोप घ्या
तुम्ही जगातल्या सर्वात महागड्या क्रीम्स वापरल्या तरी, पुरेशी झोप घेतल्याशिवाय तुमची त्वचा निरोगी दिसणार नाही. प्रौढ व्यक्तीला रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप आवश्यक असते. तुम्ही झोपेत असताना, शरीर जास्त कोलेजन तयार करतं, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण राहते. तसेच, त्वचेच्या पेशी स्वतःला वेगाने दुरुस्त करतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.