Nighty: घरातल्या कामांसाठी आणि आरामासाठी महिला नाईटीला पसंती देतात. ही पाश्चात्य संस्कृती असली तरी, आज भारतीय महिलांच्या वॉर्डरोबमध्ये नाईटीला खास स्थान आहे. पण भारतात नाईटी घालण्याची सवय कशी आणि केव्हा सुरू झाली?
आज भारतीय महिलांच्या दैनंदिन जीवनात नाईटी हा एक महत्त्वाचा पोशाख बनला आहे. घरातली कामं करताना किंवा रात्री झोपताना महिलांना नाईटी खूप सोयीची वाटते. त्यामुळेच कोट्यवधी महिलांची ती पहिली पसंती आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा भारतीय महिलांना नाईटीबद्दल माहितीही नव्हतं. त्या पारंपरिक साडी किंवा परकर-पोलकं वापरायच्या. मग हा बदल कसा झाला?
24
नाईटीचं मूळ पाश्चात्य
नाईटीचं मूळ पाश्चात्य देशांतील 'नाईट गाऊन' संस्कृतीत आहे. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील श्रीमंत महिला रात्री झोपताना लांब आणि सैलसर गाऊन घालायच्या. ब्रिटिश राजवटीत त्यांच्या कपड्यांचा प्रभाव भारतावरही पडला. पण तेव्हा नाईटी फक्त काही श्रीमंत कुटुंबांपुरतीच मर्यादित होती.
34
कमी किंमत आणि आराम
स्वातंत्र्यानंतर, विशेषतः 1970--80 च्या दशकात भारतीय जीवनशैलीत मोठे बदल झाले. नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आणि बाजारात रेडीमेड कपड्यांची विक्रीही वाढली. याच काळात नाईटीने हळूहळू बाजारात प्रवेश केला. सुरुवातीला लोक विचित्र नजरेने पाहायचे, पण नोकरी करणाऱ्या आणि श्रीमंत घरातील महिलांनी घरकामातील सोयीमुळे नाईटी वापरायला सुरुवात केली. कमी किंमत आणि आराम यामुळे शहरी महिलांमध्ये नाईटी लोकप्रिय झाली.
आता काळ पूर्णपणे बदलला आहे. अनेक महिला दिवस-रात्र नाईटी वापरतात. आज नाईटी भारतीय संस्कृतीचा एक भाग बनली आहे. तिची बाजारपेठ कोट्यवधी रुपयांची आहे. विविध रंग, डिझाईन्स आणि प्रिंट्समध्ये उपलब्ध असलेल्या नाईटी महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. परदेशी पोशाख असली तरी, आज तिने प्रत्येक भारतीय घरात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.