
मुंबई : माणसाच्या मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो का? यावर आपल्याकडे अनेक पौराणिक कथा आणि घटना ऐकायला मिळतात. भारतात तर पुनर्जन्म आणि कर्मफळ या गोष्टी नवीन नाहीत. पण आता याच पुनर्जन्मावर अमेरिकेच्या व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने एक महत्त्वाचा अभ्यास केलाय. संशोधकांनी जन्म-मृत्यू, नातेवाईक आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक रिपोर्ट तयार केलाय. या रिपोर्टनुसार, मृत्यू आणि पुनर्जन्म याच्यात सरासरी १६ महिन्यांचा गॅप असतो. माणसाला आपला पुनर्जन्म झाल्याचं समजतं का? यावरही या अभ्यासात बरीच माहिती देण्यात आलीय.
एखाद्याचा अचानक मृत्यू झाला, तर त्याचा आत्मा दुसऱ्या रूपात पुन्हा जन्म घेतो, अशी एक मान्यता आहे. अनेकदा मृत व्यक्तीचे गुण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतात. काही वेळा तर लोक स्वतःच सांगतात की त्यांना त्यांच्या मागच्या जन्माच्या गोष्टी आठवत आहेत. यातूनच पुनर्जन्माच्या कथांना बळ मिळतं. व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनुसार, मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. हा काळ साधारण १६ महिन्यांचा असतो, असं या अभ्यासात म्हटलंय.
व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अशा १६७८ लोकांच्या डेटाचा अभ्यास केला, ज्यांच्याबद्दल पुनर्जन्म झाल्याचा दावा केला गेला होता. स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी करण्यात आली. या अभ्यासातून असं समोर आलं की, मृत्यू आणि पुनर्जन्म यात सरासरी १६ महिन्यांचं अंतर असतं. पण, हेच पुनर्जन्माचं ठोस कारण आहे, असं ठामपणे सांगता येणार नाही, असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
या अभ्यासात फक्त जन्म आणि मृत्यूची आकडेवारीच तपासली नाही, तर मृत्यू अचानक किंवा अनैसर्गिक होता का, हेही पाहण्यात आलं. ज्यांचा मृत्यू अचानक झालाय, त्यांच्या पुनर्जन्माची शक्यता जास्त असल्याचं दिसून आलं. अनपेक्षित मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये पुनर्जन्माचा काळ आणखी कमी होतो. हा काळ सरासरी १६ महिन्यांपेक्षा ४० टक्क्यांनी कमी असतो. म्हणजेच, अत्यंत अनपेक्षित मृत्यू झाल्यास पुनर्जन्म अवघ्या ८ ते १० दिवसांत होऊ शकतो. या काही दिवसांतच ती व्यक्ती पुन्हा जन्म घेते, असं अभ्यासात म्हटलंय.
संशोधकांच्या टीमने आकडेवारी आणि डेटा तपासून हा सरासरी काळ सांगितलाय. पण, हा अभ्यास म्हणजे पुनर्जन्म सिद्ध करणारा पुरावा नाही. ज्या कुटुंबांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, त्यांच्याकडे काही भक्कम कारणं नक्कीच दिसली. पण यावरून पुनर्जन्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत नाही, असं व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या टीमने स्पष्ट केलंय. तरीही, यावर अजून संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, पुनर्जन्म ही केवळ एक भाकडकथा आहे, असं म्हणून ती पूर्णपणे नाकारता येणार नाही. पुढच्या अभ्यासात यावर आणखी स्पष्टता येऊ शकते.
अमेरिकन युनिव्हर्सिटीचा हा अभ्यास आणि भारतात आधीपासून असलेल्या पौराणिक कथा, ग्रंथांमधील उल्लेख यात बरंच साधर्म्य पाहायला मिळतंय. येत्या काळात पुनर्जन्मावर होणाऱ्या संशोधनातून आणखी काही रंजक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.