Published : Jun 27, 2025, 03:48 PM ISTUpdated : Jun 27, 2025, 03:49 PM IST
मुंबई - प्रत्येकाच्या घरी लहान का असेना पण एक तुळशीचे रोप असते. त्याची दररोज मनोभावे पूजा केली जाते. देवाची पूजा केली आणि तुळशीची केली नाही असे होत नाही. तुळशीचे रोप आपल्याला लक्ष्मी येण्याचे संकेत अगोदरच देतात असे म्हटले जाते. जाणून घ्या याचे संकेत
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. ती घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. हिंदू धर्मानुसार, तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे. घरातील तुळस हिरवीगार आणि निरोगी असेल तर घरात लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही काही मान्यता आहेत. त्यानुसार, घरात लावलेली तुळस नेहमीच आनंद, शांती आणि समृद्धी देते. पण, आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे हे तुळशी काही संकेतांद्वारे सांगते.
25
१. तुळस जोमाने वाढली तर..
तुमच्या घरातील तुळस झपाट्याने वाढत असेल, हिरवीगार असेल आणि तिची पाने चमकत असतील तर ते शुभ मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, तुळस हिरवीगार असेल आणि तिची पाने चमकत असतील तर ते घर सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. हे केवळ आर्थिक संकट दूर करण्याचेच नव्हे तर कारकिर्दीत यशाचे मार्ग उघडण्याचेही संकेत आहे.
35
२. तुळशीचे बी..
तुळशीच्या फांद्या जोमाने वाढल्या की त्याला फुले येऊन बिया येतात. हे देखील खूप शुभ संकेत मानले जाते. असे फुले येऊन बिया येणे म्हणजे घरात सुख आणि समृद्धी वाढणार असल्याचे संकेत आहे. यासोबतच, कुटुंबातील एखाद्या सदस्याचे उत्पन्नही खूप वाढते. तुळशीभोवती फुलपाखरे फिरणे हे देखील शुभ संकेत आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरावर देवांचा विशेष आशीर्वाद आहे.
तुळशीच्या पानांना हलकासा सुगंध असतो. पण, हा सुगंध अचानक तीव्र झाला तर ते शुभ संकेत मानले जाते. तुळशीचा तीव्र सुगंध म्हणजे घरातून नकारात्मकता निघून जात आहे. सकारात्मकता येत आहे असे मानले जाते. यासोबतच, हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहे.
55
तुळस हिरवीगार राहणे..
कधीकधी, कडक उन्हामुळे, तुळशीची पाने आकुंचित होतात किंवा सुकून पडतात. पण, उन्हातही तुळस हिरवीगार राहिली तर ज्योतिषशास्त्रात ते शुभ मानले जाते. याचा अर्थ देवांचा आशीर्वाद घरावर आहे. तसेच, तुमच्या तुळशीच्या कुंडीत दूर्वा वाढली तर तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि घरात सकारात्मकता येईल.