ट्यूब टॉप स्टायलिंगचे जबरदस्त टिप्स, माहिती जाणून घ्या

Published : May 05, 2025, 04:43 PM IST
ट्यूब टॉप स्टायलिंगचे जबरदस्त टिप्स, माहिती जाणून घ्या

सार

ट्यूब टॉप स्टायलिंगचे अनेक प्रकार आहेत. ट्यूब टॉप वेस्टर्न ते इंडियन लुकसाठी देखील परिधान करू शकता. ट्यूब टॉप जॅकेट, शॉर्ट्स, पँट, साडी, शरारा, स्कर्टसोबत कसे स्टाइल करता येईल ते जाणून घ्या.

ट्यूब टॉप स्टायलिंग: आजकाल मार्केटमध्ये सातत्याने फॅशनचे ट्रेंड बदलत राहतात. यामुळे बहुतांश महिला, तरुणी नवे ट्रेंड फॉलो करणे पसंत करतात. सध्या मार्केटमध्ये तुम्हाला टॉपचे काही प्रकार पाहायला मिळतील. पण ते योग्य पद्धतीने स्टाइल केल्यास तुमचा लुक अधिक खुलून जाईल. यापैकीच एक म्हणजे ट्यूब टॉप. कॉलेजला जाणाऱ्या तरुणींमध्ये ट्यूब टॉपची क्रेझ अधिक असते. तुम्ही ट्यूब टॉप वेस्टर्न ते इंडियन लुकसाठी देखील परिधान करू शकता. ट्यूब टॉप वेगवेगळ्या पद्धतीने कसा स्टाइल करता येईल हेच जाणून घेऊया....

ट्यूब टॉप विथ जॅकेट
बोल्ड लुकसाठी तुम्ही ट्यूब टॉप परिधान करू शकता. पण शरीराच्या आकारानुसार ट्यूब टॉपमध्ये सुंदर आणि परफेक्ट लुकसाठी यासोबत जॅकेट पेअर करू शकता. ट्यूब टॉप विथ जॅकेटमुळे तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक मिळेल.

ट्यूब टॉप विथ शॉर्ट्स
ट्यूब टॉप विथ शॉर्ट्समुळे तुमचा लुक एक्स्ट्रा ग्लॅमरस दिसेल. याचे कॉम्बिनेशन अत्यंत सुंदर दिसते. बहुतांश सेलिब्रिटींनाही ट्यूब टॉप विथ शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिले असेल. ट्यूब टॉप विथ शॉर्ट्समधील हा लुक तुम्ही देखील ट्राय करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला ट्यूब टॉपचे वेगवेगळे डिझाइन्स मिळतील जे शॉर्ट्सवर छान दिसतात.

ट्यूब टॉप विथ पँट
ट्यूब टॉप कोणत्याही पँटसोबत परिधान करू शकता. ट्यूब टॉप विथ पँट असणारा को-ऑर्ड सेटदेखील छान दिसतो. खरंतर सध्या को-ऑर्ड सेटचा ट्रेंड असून यामध्ये तुम्ही कूल दिसता.

ट्यूब टॉप विथ साडी
आजकाल बहुतांश महिला साडीला वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न करतात. साडीसोबत तुम्ही ट्यूब टॉप ब्लाउजप्रमाणे परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक ग्लॅमरस दिसतो. ट्यूब टॉपमध्ये कंम्फर्टेबल नसल्यास एखादे शॉर्ट जॅकेट पेअर करू शकता. यामुळे तुमचा लुक हटके दिसून येईल. ट्यूब टॉप हे नेट फॅब्रिक असणाऱ्या साडीसोबत सुंदर दिसतात.

ट्यूब टॉप विथ शरारा
शरारा सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. ट्यूब टॉप तुम्ही कोणत्याही फॅब्रिक कपड्यांसोबत परिधान करू शकता. याशिवाय श्रग देखील ट्यूब टॉपवर छान दिसतात. ट्यूब टॉप विथ शरारा तुम्ही एखाद्या पार्टी, फंक्शनवेळी परिधान करू शकता.

ट्यूब टॉप विथ स्कर्ट
एखाद्या कॉकटेल पार्टीसाठी ट्यूब टॉप विथ स्कर्टचा पर्याय बेस्ट आहे. यामुळे तुम्ही बोल्ड आणि ब्युटीफुल दिसाल. या आउटफिट्ससोबत केस मोकळे किंवा कर्ल्स करू शकता.

PREV

Recommended Stories

Relationship Tips : एखाद्या नात्यात दूरावा येण्यासाठी कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी
डीप यू ते स्वीटहार्ट नेकलाइन, 2025 मधील ट्रेन्डी ब्लाऊज डिझाइन्स