
जुना टॉवेल वापरा: घरातील काही वस्तू एकदा वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात. अनेकांना माहीत नसते की जुन्या वस्तूंचा पुन्हा वापर कसा करायचा. त्यापैकीच एक म्हणजे टॉवेल. टॉवेल जुना झाला की तो फेकून देता का? पण जुन्या टॉवेलचा अनेक प्रकारे वापर करता येतो.
जुन्या टॉवेलपासून बॅग ते मुलांची खेळणी ठेवण्यासाठी पिशवी बनवू शकता. जुन्या टॉवेलचा पुन्हा वापर करण्यासाठी काही खास टिप्स पाहूया…
टॉवेलपासून स्टायलिश बॅग कशी बनवायची?
पुढील स्टेप्स फॉलो करा
पायपुसणे
घराबाहेरून आल्यानंतर बाहेरची माती-घाण घरात येऊ नये म्हणून दरवाज्याबाहेर आपण पायपुसणे ठेवतो. जुन्या टॉवेलचे पायपुसणे बनवू शकता. बाजारातून पायपुसणे खरेदी करण्याऐवजी घरच्या घरी जुन्या टॉवेलचे पायपुसणे बनवू शकता.
धूळ स्वच्छ करण्यासाठी वापरा
बुटांचे रॅक किंवा कपाटावर ठेवल्या जाणाऱ्या कापडाप्रमाणे जुन्या टॉवेलचा वापर करू शकता. यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला हव्या त्या आकारात टॉवेल कापून वापरू शकता.
घराची स्वच्छता करण्यासाठी वापरा
जुन्या टॉवेलच्या मदतीने घराची स्वच्छता करू शकता. टॉवेल आकाराने जाड असल्याने घराची चांगली स्वच्छता होऊ शकते. किचनमधील कपाट, धूळ लागलेल्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी देखील जुन्या टॉवेलचा वापर करू शकता.
जुन्या टॉवेलपासून या गोष्टीही बनवू शकता