बरणीचे घट्ट झालेले झाकण उघडत नाही? शेफ पंकज यांनी सांगितली खास ट्रिक (VIDEO)

Published : Mar 21, 2025, 08:47 AM ISTUpdated : Mar 21, 2025, 08:48 AM IST
Chef Pankaj Kitchen Tips

सार

बहुतांशवेळेस किचनमधील काही डब्यांचे झाकण काहीही केल्या उघडत नाही. अशातच मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी डाळ आणि मसाल्याच्या डब्याचे झाकण घट्ट झाले असल्यास ते उघडण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी हे सांगितले आहे.

Kitchen Tips : काहीवेळेस किचनमध्ये ठेवण्यात आलेल्या मसाले किंवा लोणच्याच्या बरणीचे झाकण अधिक घट्ट होते. हे झाकण उघडण्यासाठी खूप प्रयत्नही केला जातो. पण कधीकधी अशी स्थिती निर्माण होते की, हात दुखतात तरीही झाकण उघडले जात नाही. खरंतर, वातावरणातील बदलामुळे काच किंवा प्लास्टिकच्या बरणीचे झाकण अधिक घट्ट होऊ शकते. अशातच शेफ पंकज भदौरिया (Chef Pankaj Bhadouria) यांनी घट्ट झालेले बरणीचे झाकण कसे उघडायचे याची सोपी ट्रिक सांगितली आहे.

वापरा ही खास ट्रिक

डब्याचे झाकण अधिक घट्ट झाले असल्यास, सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा. यावेळी डब्याचे झाकण पाण्यात बुडेल एवढेच पाणी पॅनमध्ये घ्या. यामध्ये प्लास्टिक किंवा काचेचा डबा उलटा करुन गरम पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवा. पाच मिनिटांनंतर डब्याचे झाकण पाण्यातून काढून एका सुक्या कापडाने पुसून उघडण्याचा प्रयत्न करा. ही ट्रिक फॉलो करुन डब्याचे घट्ट झालेले झाकण सहज उघडले जाऊ शकते.

अशी काम करते ट्रिक

खरंतर, ज्यावेळी एखादा धातू गरम पाण्यात बुडवल्यास तो पसरला जाऊ लागतो. यामुळे डब्याचे झाकण सहज उघडले गेले.

 

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!