Tattoo Meaning : टॉप १० लोकप्रिय टॅटूंचा अर्थ माहितीये का? प्रत्येक डिझाईनमागे आहे खास गोष्ट!

Published : Oct 24, 2026, 09:45 AM IST

Tattoo meaning : हार्ट, बटरफ्लाय, इन्फिनिटी, पीस आणि सिंह अशा १० लोकप्रिय टॅटू डिझाईन्सचा नेमका अर्थ काय असतो ते जाणून घ्या. प्रेम, धैर्य, स्वातंत्र्य आणि आशा अशा अनेक भावना या टॅटूंमधून कशा व्यक्त होतात, याची रंजक माहिती आपण पाहणार आहोत.

PREV
111
टॅटूंचा नेमका अर्थ काय असतो?

शरीरावर काढलेला छोटासा टॅटू फक्त फॅशनसाठी नसतो. हातावरचं फुलपाखरू, मनगटावरचं हार्ट किंवा बोटावरचं इन्फिनिटी चिन्ह, या प्रत्येक टॅटूमागे एखादी आठवण, भावना किंवा खास गोष्ट दडलेली असते.

काही जण आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत टॅटू काढतात. तर काही जण आपला आत्मविश्वास दाखवण्यासाठी किंवा आयुष्यातील कठीण प्रसंग विसरू नयेत म्हणून टॅटूची निवड करतात. पण सध्या ट्रेंडिंग असलेल्या या टॅटू डिझाईन्सचा खरा अर्थ तुम्हाला माहितीये का?

दिसायला आकर्षक असलेल्या १० लोकप्रिय टॅटू डिझाईन्स आणि त्यांचा अर्थ आपण इथे पाहणार आहोत. कदाचित यातून तुम्हाला तुमच्या पुढच्या टॅटूसाठी एखादी भन्नाट आयडिया नक्की मिळेल.

211
सेमीकोलन टॅटू (Semi colon - ;)

आयुष्य संपलं असं वाटत असतानाही प्रवास सुरूच राहतो, हे सांगण्यासाठी अनेक जण सेमीकोलन (;) टॅटू काढतात.

एखादं वाक्य न संपता पुढे सुरू राहतं, तसंच आयुष्यातही संकटांवर मात करून आपण नवी सुरुवात करू शकतो, हा विश्वास यातून दिसतो.

विशेषतः मानसिक आरोग्य, आशा आणि आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द दाखवण्यासाठी लोक या टॅटूची निवड करतात. हे चिन्ह छोटं असलं तरी, 'माझी गोष्ट अजून संपलेली नाही' असा मोठा संदेश या सेमीकोलन टॅटूमधून मिळतो.

311
आर्म बँड टॅटू (Arm Band Tattoo)

हातात एखादं कडं घातल्यासारखा हा टॅटू दंडावर किंवा मनगटावर गोल आकारात काढला जातो.हा टॅटू ताकद, एकता, जिद्द आणि आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीसोबत असलेलं घट्ट नातं दर्शवतो. काही जण आयुष्यात घडून गेलेल्या महत्त्वाच्या घटनांच्या आठवणीतही हा टॅटू काढतात.

411
सन टॅटू (Sun Tattoo)

अंधार दूर करून प्रकाश देणाऱ्या सूर्याप्रमाणेच, आयुष्यातही आत्मविश्वासाने पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सन टॅटू एकदम परफेक्ट आहे.

सूर्य हा ऊर्जा, आशा, ताकद आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. ज्यांना आयुष्यात सकारात्मक विचार ठेवायचे आहेत आणि स्वतःचा आत्मविश्वास दाखवायचा आहे, ते हा टॅटू निवडू शकतात.

तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी, नवी पहाट नक्की होईल, याची आठवण हा सुंदर सन टॅटू करून देतो.

511
ॲरो टॅटू (Arrow Tattoo)

बाण जसा एका विशिष्ट दिशेने पुढे जातो, तसाच हा टॅटू ध्येय गाठण्यासाठी केलेले प्रयत्न, प्रगती आणि जिद्द दर्शवतो. आयुष्यात सतत पुढे जाण्याची इच्छा असणारे लोक हा टॅटू काढतात.

ॲरो टॅटू म्हणजे ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं, लक्ष केंद्रित करणं आणि अडथळ्यांवर मात करणं. काही जण आपलं ध्येय विसरू नये आणि आपण इथपर्यंत कसा प्रवास केलाय, हे लक्षात ठेवण्यासाठी हा टॅटू काढतात.

611
हार्ट टॅटू (Heart Tattoo)

प्रेम, जिव्हाळा आणि जवळच्या नात्यांच्या आठवणी कायम सोबत राहाव्यात, यासाठी अनेक जण हार्ट टॅटूची निवड करतात. फक्त जोडीदाराच्याच नाही, तर आई-वडील, कुटुंब आणि मित्रांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठीही हा टॅटू काढला जातो.

छोटं हार्ट, डबल हार्ट किंवा नाव लिहिलेलं हार्ट अशा अनेक डिझाईन्समध्ये हा टॅटू काढता येतो. दिसायला साधा असला तरी यामागे खूप खोल भावना दडलेल्या असतात.

711
बटरफ्लाय टॅटू (Butterfly Tattoo)

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी, एक दिवस आपण नक्कीच उंच भरारी घेऊ शकतो, याची आठवण बटरफ्लाय टॅटू करून देतो.

अळीपासून सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर एका सुंदर फुलपाखरात होणारं तिचं रूपांतर, हे बदल आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे.ज्यांनी आयुष्यात कठीण काळ पाहिलाय आणि जुन्या वेदना विसरून नव्या वाटेवर चालायचंय, ते हा टॅटू निवडू शकतात. मुक्तपणे जगण्याची इच्छा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची जिद्द यातून दिसते.

तुमच्या आयुष्यात झालेले बदल आणि आता सुरू होणारा नवा अध्याय, याची सुंदर आठवण म्हणजे हा बटरफ्लाय टॅटू.

811
लायन टॅटू (Lion Tattoo)

सिंह हा ताकद, धैर्य आणि नेतृत्व गुणांचं प्रतीक मानला जातो. आयुष्यात कितीही मोठी संकटं आली तरी त्यांना धैर्याने सामोरं जाण्याची आणि नेहमी आत्मविश्वासाने राहण्याची इच्छा असणारे लोक हा टॅटू काढतात.

ज्यांना आपले नेतृत्व गुण आणि मानसिक कणखरपणा दाखवायचा आहे, त्यांच्यासाठी ही डिझाईन एकदम परफेक्ट आहे.

911
इन्फिनिटी टॅटू (Infinity Tattoo)

कधीही न संपणारं प्रेम, अतूट मैत्री आणि काळाच्या पलीकडे जाणारं नातं, अशा खोल भावनांचं प्रतीक म्हणजे इन्फिनिटी टॅटू.

आठ या अंकाला आडवं केल्यासारखं दिसणारं हे चिन्ह, अनंत काळ आणि सातत्य दर्शवतं. फक्त प्रेमच नाही, तर कुटुंबावरची माया, मैत्री आणि आयुष्यात कायम टिकून राहावी अशी वचने दाखवण्यासाठी अनेक जण हा टॅटू निवडतात.

नावासोबत इन्फिनिटी, हार्टसोबत जोडलेली डिझाईन किंवा पिसांसोबतचं कॉम्बिनेशन अशा अनेक प्रकारे हा टॅटू काढता येतो. आयुष्यात कितीही बदल झाले तरी प्रेम आणि नाती कायम राहतील, याची आठवण हा टॅटू करून देतो.

1011
फिनिक्स बर्ड टॅटू (Phoenix Tattoo)

अपयशाने खचून न जाता, राखेतून पुन्हा भरारी घेणारा पक्षी म्हणून फिनिक्स ओळखला जातो. हा टॅटू पुनर्जन्म, आशा आणि जिद्दीचं प्रतीक आहे.

कठीण प्रसंगांवर मात करून नव्याने आयुष्य सुरू करू पाहणाऱ्यांसाठी हा टॅटू एकदम योग्य आहे. आपण पडलो तरी पुन्हा उठू शकतो, याची आठवण करून देणारा हा टॅटू तुमच्या आयुष्यातील संघर्षाच्या विजयाचं प्रतीक बनू शकतो.

1111
फेदर टॅटू (Feather Tattoo)

फेदर म्हणजेच पिसांचा टॅटू हा सहसा स्वातंत्र्य, हलकं-फुलकं मन, आशा आणि स्वतःची वेगळी वाट निवडण्याच्या इच्छेशी जोडला जातो. काही जण आयुष्यातून निघून गेलेल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणीतही हा टॅटू काढतात.

ज्यांना स्वतःच्या अटींवर जगायचंय आणि वेगळी ओळख निर्माण करायचीय, त्यांच्यासाठी हा टॅटू परफेक्ट आहे. तुमच्या स्वप्नांना पंख देऊन, सर्व अडथळे पार करून पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी फेदर टॅटू हा एक सुंदर पर्याय आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories