TV Remote : रिमोट आपटल्यावरच का चालतो? यामागे आहे भन्नाट सायन्स

Published : Sep 11, 2026, 03:43 PM IST

बंद पडलेला टीव्ही रिमोट ठोकल्यावर किंवा आपटल्यावर लगेच कसा काय चालू होतो? यामागे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे कोणते नियम आहेत, बॅटरीचं ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि यावर सोपे उपाय कोणते, हे जाणून घेऊया.

PREV
16
रिमोट परत कसा सुरू होतो?

मुंबई : रिमोटमध्ये जिथे बॅटरी बसवतात, तिथे धातूच्या स्प्रिंग (Terminals) असतात. हवेतील ओलावा आणि धुळीमुळे बॅटरीच्या टोकावर आणि स्प्रिंगवर गंजाचा एक पातळ थर (Oxidation layer) जमा होतो. हा थर विजेचा प्रवाह अडवतो. जेव्हा आपण रिमोटला ठोकतो, तेव्हा घर्षणामुळे (Friction) हा थर बाजूला सरकतो आणि विजेचा प्रवाह पुन्हा सुरू होऊन रिमोट चालू होतो.

26
स्प्रिंग सैल होते आणि हलते
अनेकदा रिमोट हातातून खाली पडल्यामुळे बॅटरीला घट्ट धरून ठेवणारी स्प्रिंग सैल होते (Loose contact). अशावेळी रिमोटला आपटल्यास बॅटरी थोडी हलते आणि पुन्हा योग्य जागी बसते. यामुळे कनेक्शन पुन्हा जुळतं आणि रिमोट काम करू लागतो.
36
सेल खराब होत असेल तर...
जेव्हा बॅटरीचं आयुष्य संपत येतं, तेव्हा तिच्या आतल्या रासायनिक क्रिया (chemical reaction) मंदावतात. रिमोटला ठोकल्यामुळे किंवा हलवल्यामुळे बॅटरीमधील रसायनं थोडी हलतात आणि क्षणभरासाठी थोडा जास्त व्होल्टेज तयार होतो. टीव्हीला सिग्नल पाठवण्यासाठी एवढी ऊर्जा पुरेशी असते.
46
रिमोट ठोकल्यावरच काम करतो?

रिमोट फक्त ठोकल्यावरच काम करत असेल, तर तो तुम्हाला काही स्पष्ट संकेत देत आहे -

  • बॅटरीचं आयुष्य संपलं आहे: तुमच्या रिमोटमधील बॅटरी पूर्णपणे संपण्याच्या (drain) मार्गावर आहेत.
  • कार्बन किंवा घाण साचली आहे: बॅटरीच्या स्प्रिंगवर धूळ किंवा ओलाव्यामुळे गंज चढला आहे.
56
रिमोट सतत ठोकू नका
रिमोट चालत नसेल तर त्याला हाताने किंवा सोफ्यावर आपटणं हा कायमचा उपाय नाही. असं वारंवार केल्याने रिमोटच्या आत असलेलं मदरबोर्ड (Circuit Board), आयआर सेन्सर (IR LED) किंवा प्लास्टिकचे लॉक तुटू शकतात. यामुळे तुमचा रिमोट कायमचा खराब होऊ शकतो.
66
रिमोट नीट चालण्यासाठी असा वापर करा
रिमोटला ठोकण्याऐवजी, बॅटरीचं कव्हर उघडा आणि दोन्ही बॅटरी बोटानेच दोन-तीन वेळा गोल फिरवा (Rotate करा). यामुळे गंज निघून जाऊन कनेक्शन लगेच सुरू होईल. स्प्रिंगवर घाण असेल तर ती कोरड्या कपड्याने किंवा रबरने (Eraser) स्वच्छ करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लगेच नवीन बॅटरी टाका. तुमचा रिमोट पुन्हा पहिल्यासारखा काम करू लागेल!
Read more Photos on

Recommended Stories