Teachers Day 2024 : शिक्षक दिनानिमित्त शाळेत, महाविद्यालयात देण्यासाठी सोपे भाषण

Teachers Day Speech in Marathi : शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रति प्रेम, आदर आणि सन्मान व्यक्त करतात. यंदा येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शाळेत, महाविद्यालयात देण्यासाठी सोपे भाषण पाहा.

Teachers Day Speech in Marathi : देशात प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रापती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे. या दिवशी डॉ. सर्वपल्ली यांची जयंती असते. डॉ. सर्वपल्ली यंचे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रख्यात विद्वान होते. शिक्षक दिन आपल्या शिक्षकांप्रति प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. अशातच यंदाच्या शिक्षक दिनानिमित्त शाळेत, महाविद्यालयात देण्यासाठी सोपे भाषण पाहूया.

शिक्षक दिनानिमित्त मराठीत भाषण

माननीय प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि माझ्या मित्रमैत्रीणींना माझा नमस्कार.

आज आपण येथे शिक्षक दिनानिमित्त एकत्रित आलो आहोत. सर्वप्रर्थम सर्वांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. शिक्षक आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ आणि मार्गदर्शक असतात. शिक्षकांकडून मुलांवर आई-वडिलांसारखे संस्कार केले जातात. एवढेच नव्हे प्रत्येक मुलामधील कौशल्य पाहून त्याला त्यानुसार आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवला जातो. ज्याप्रकारे मातीपासून भांडी अथवा कलाकृती तयार करण्याचे काम कुंभार करतो त्याचप्रमाणे शिक्षकांचे आपल्या आयुष्याला कलाटणी लावण्यासाठी फार मोठे योगदान असते. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यात यशाच्या मार्गाने घेऊन जातात. यामुळे शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आठवण काढून त्यांना वंदन करुया. 5 सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती असते. आजचा दिवस डॉ. सर्वपल्ली यांना समर्पित आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे पहिले उपराष्ट्रपती, महान शिक्षक होते.

5 सप्टेंबर 1888 साली तमिळनाडूमधील लहानश्या गावात जन्मलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 27 वेळा नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वर्ष 1954 मध्ये सर्वपल्ली यांना भारत रत्नही मिळाला होता.

डॉ. सर्वपल्ली यांचा जन्मदिन शिक्षक दिन का साजरा करतात हे माहितेय का? याबद्दल मी सविस्तर सांगतो. एकदा सर्वपल्ली यांना त्यांच्या विद्यार्थ्याने विचारले की, तुमच्या जन्मदिनानिनित्त कोणते गिफ्ट देत वाढदिवस साजरा करू. यावर राधाकृष्णन यांनी उत्तर देत म्हटले की, हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करू शकता. यानंतर डॉ. सर्वपल्ली यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली आणि सन्मानार्थ 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिक्षक समाजला वळण लावण्याचे काम करतात. ते आपले मार्गदर्शक असतात. शिक्षकांचे स्थान आई-वडिलांप्रमाणे असते. आई-वडील मुलांना उत्तम संस्कार देतात तर शिक्षक मुलाचे आयुष्य घडवतात. यामुळे आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरीही आपल्या शिक्षकांना विसरू नये. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिक्षकांनी वेळोवेळी दिलेला मोलाचा सल्ला नक्कीच कामी येतो हे लक्षात ठेवा. येथेच माझे भाषण संपवतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.

आणखी वाचा : 

Teachers Day 2024: 5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा करतात?, जाणून घ्या

Jyeshtha Gauri Avahana : गौरीला 10 मिनिटांत या 5 वेगळ्या प्रकारे नेसवा साडी

Read more Articles on
Share this article