मुंबई - दररोज लाखो लोक ताजमहल पाहण्यासाठी आग्र्याला भेट देतात. आयुष्यात ताजला भेट दिली नाही, त्याच्यासमोर पार्टनरसोबत फोटो काढला नाही तर चुकल्या चुकल्यासारखे होते. पण हाच ताज महाल अनेक रहस्यांनी वेढलेला आहे. यातील एक रहस्य आज आम्ही सांगणार आहोत..
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. बादशहा शाहजहानने आपली बेगम मुमताज हिच्या स्मृतीप्रित्यर्थ ताजमहल बांधला. ताजमहल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. २००७ मध्ये याचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये करण्यात आला. १९८३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
26
ताजमहल हे भारतीय स्थापत्यकलेचे एक अद्वितीय उदाहरण
ताजमहल हे भारतीय स्थापत्यकलेचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनवलेल्या या थडग्याला बांधण्यासाठी २२ वर्षे लागली. ताजशी संबंधित अनेक मनोरंजक आणि गूढ गोष्टी आहेत, ज्यांची वेळोवेळी चर्चाही होते. पण ताजमहलभोवती तुळशीची रोपे का लावली आहेत, यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
36
तुळस आहे गुणकारी
ताजमहलभोवती तुळशीची रोपे लावण्यामागे एक मोठे कारण आहे, ते जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुळशीचा रोप दररोज सुमारे २० तास ऑक्सिजन आणि चार तास ओझोन वायू सोडते. एका संशोधनानुसार, तुळस सुमारे १०० चौरस मीटरमध्ये हवा शुद्ध करते, ज्यामुळे कोणतेही कीटक त्याच्या जवळ येत नाहीत.
तुळस हवेतील कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखे हानिकारक वायू कमी करते. ताजमहलभोवतील प्रदूषणामुळे संगमरवर पिवळा पडतो. पण तुळस हवा स्वच्छ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे ताजमहलचा पांढरेपणा आणि चमक टिकून राहते.
56
२००९ मध्ये लावली रोपे
खरं तर, ताजमहलचे रक्षण त्याच्याभोवती असलेल्या तुळशीच्या रोपांमुळे होते. तुळशीतून बाहेर पडणारा ओझोन वायू ताजमहलला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. २००९ मध्ये, आग्रा वनविभागाने प्रदूषण रोखण्यासाठी ताजमहलभोवती हजारो तुळशीची रोपे लावली.
66
त्यामागे सायंटिफीक कारण
तुळशीच्या रोपांमुळे ताजमहलजवळ कोणतेही सूक्ष्मजीव किंवा कीटक येत नाहीत. यामुळे ताजमहलच्या भिंती आणि जमीन दोन्ही स्वच्छ राहतात. तसेच, ताजमहलभोवतील हवा शुद्ध राहते. त्यामुळे तुळशीची रोपे लावण्यात आली आहे. त्यामागे सायंटिफीक कारण आहे.