Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीआधी बदलणार या 3 राशींचे भाग्य

Published : Jan 09, 2025, 12:30 PM IST
Rashifal

सार

Makar Sankranti 2025 : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. याआधी सूर्य नक्षत्राच्या परिवर्तानामुळे 12 राशींपैकी 3 राशींचे भाग्य बदलणार आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

Surya Nakshatra Parivartan 2025 : मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. या दिवशी तिळाचे लाडू एकमेकांना वाटून नात्यातील गोडवा दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. अशातच ज्योतिष गणनेनुसार, सुर्य देव सध्या धनु राशीत असून 11 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. यामुळे राशी परिवर्तनापूर्वी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होणे अत्यंत खास मानले जात आहे. यामुळे 12 राशींपैकी 3 राशींना याचा फायदा होणार आहे. या 3 राशींच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यापारात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...

मेष राशी

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल मानले जात आहे. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची प्रगती होणार आहे. याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना दुप्पट नफा होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून लांबणीवर गेलेली कामे पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना संधी मिळेल. याशिवाय वैवाहिक आयुष्यासंबंधित समस्या दूर होतील.

सिंह राशी

सिंह राशीमधील संबंधित व्यक्तींना सूर्य देवाची विशेष आशीर्वाद मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन शुभ मानले जात आहे. स्पर्धात्मक परिक्षांमध्ये उत्तम गुण मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम नफा मिळेल. गुंतवणूकीतून पैसे येतील. मानसिक आरोग्य उत्तम राहिल.

धनु राशी

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे धनु राशीतील व्यक्तींच्या आयुष्यात फार मोठा बदल होणार आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचे प्रमोशन होऊ शकते. अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात मन लागेल. वैवाहिक कपलसाठी हा काळ उत्तम राहिल. व्यवसायातील आर्थिक स्थिती उत्तम राहिल.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Makar Sankranti:मकरसंक्रांतीला तिळगुळ का वाटतात, काय आहे अख्यायिका?

मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळाचे लाडू, सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी!

PREV

Recommended Stories

iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!
Horoscope 7 December : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!