Surya Grahan 2025 : यंदाच्या वर्षातील दुसरे सुर्यग्रहण 2 ऑगस्टला नव्हे तर या दिवशी असणार, वाचा योग्य तारखेसह वेळ

Published : Aug 01, 2025, 09:35 AM IST
surya grahan 2024

सार

यंदाच्या वर्षातील दुसरे सुर्यग्रहण येत्या 2 ऑगस्टला नसणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या माहितीमुळे योग्य तारीख आणि वेळ काय आहे हे जाणून घ्या.

Surya Grahan 2025 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर येत्या 2 ऑगस्टला सुर्यग्रहण असल्याच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. असे म्हटले जात आहे की, 2 ऑगस्टला 100 वर्षांतील सर्वाधिक मोठे पूर्ण सुर्यग्रहण लागणार आहे. मात्र सत्य या उलट आहे. तर तुम्ही देखील याच भ्रमात असाल्यास ही माहिती चुकीची आहे. यामुळे 2 ऑगस्टला कोणतेही सुर्यग्रहण नाहीये.

2 ऑगस्टला सुर्यग्रहण नाही

इस्रो आणि नासाच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, येत्या 2 ऑगस्टला कोणत्याही प्रकारचे सुर्यग्रहण नसणार आहे. ही तारीख कोणत्याही खगोलीय घटनेशी संबंधित नाही ना भारत किंवा जगात या दिवशी सुर्याचा अंशत: किंवा पूर्णपणे भाग झाकला जाणार नाहीये.

यंदा कधी सुर्यग्रहण

वर्ष 2025 मधील पहिले सुर्यग्रहण 25 मार्चला झाले आहे. आता दुसरे सुर्यग्रहण येत्या 21 सप्टेंबरला असणार आहे. हे अंशत: दिसणारे सुर्यग्रहण (Partial Solar Eclipse) असणार आहे.

का उडाली अफवा?

प्रत्येक वेळी असणाऱ्या सुर्यग्रहणाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढली जाते. यंदा काही फेक बेवसाइट्स, सोशल मीडिया अकाउंट्स नागरिकांची दिशाभूल करत आहेत. यामुळेच सुर्यग्रहण 2 ऑगस्टला असणार अशी अफवा पसरली गेली.

21 सप्टेंबरला कंकणाकृती सुर्यग्रहण

येत्या 21 सप्टेंबरला जे सुर्यग्रहण असणार आहे जे कंकणाकृती असणार आहे. याला रिंग ऑफ फायर असेही म्हटले जाते. दरम्यान, हे सुर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये.ग्रहण भारतीय वेळेनुसार, 21 सप्टेंबरला रात्री 11 वाजता सुर्यग्रहण सुरू होणार आहे. हे सुर्यग्रहण 22 सप्टेंबरला 3 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटे असणार आहे. मात्र हे भारतात दिसणार नसल्याने सूतककाळ देशात नसणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Horoscope 10 December : आज बुधवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची कृपादृष्टी राहिल!
आत्याचं स्पेशल गिफ्ट! 2 ते 5 हजारात भाचीसाठी खरेदी करा सर्वात सुंदर चांदीचे पैंजण!