Sun Enters Libra : सूर्याचा तूळ राशीत प्रवेश; 4 राजयोग बनणार, या 6 राशींचे नशीब फळफळणार

Published : Oct 06, 2026, 04:19 PM IST

ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरमुळे तब्बल ४ खास राजयोग तयार होत आहेत. याचा थेट फायदा ६ राशींच्या लोकांना होणार असून त्यांचं आयुष्यच बदलून जाईल.

PREV
17
तूळ राशीत सूर्याचा प्रवेश

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला खूप महत्त्व आहे. सूर्य हा आत्मविश्वास, सत्ता, नेतृत्व, सन्मान, वडील आणि सरकारी कामांचा कारक मानला जातो. १७ ऑक्टोबरला रात्री ७.५७ वाजता सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल. १६ नोव्हेंबरपर्यंत सूर्य याच राशीत राहील.

तूळ राशीत आधीपासूनच शुक्र आणि बुध विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य तिथे गेल्यावर अनेक महत्त्वाचे राजयोग तयार होतील. बुधासोबत 'बुधादित्य राजयोग' आणि शुक्रासोबत 'शुक्रादित्य योग' बनेल. तसेच बुध आणि शुक्र एकत्र असल्याने 'लक्ष्मी नारायण राजयोग' आधीच सक्रिय असेल.

याशिवाय तूळ राशीत सूर्य नीच स्थितीत असतो, त्यामुळे 'नीचभंग राजयोग' सुद्धा तयार होईल. या ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींना नोकरी, पैसा, पद आणि नव्या संधींमध्ये मोठा फायदा मिळेल. चला तर मग, या सूर्य गोचरमुळे कोणत्या ६ राशींना बंपर फायदा होणार.

27
सिंह

सूर्याचा तूळ राशीतील प्रवेश सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि कामाचा वेग वाढवेल. तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात, त्यात आता यश मिळेल.

तुमची रखडलेली कामे आता मार्गी लागतील. नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. पगारवाढ किंवा प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.

व्यापारी आणि व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला नव्या संधी मिळतील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य असल्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

37
तूळ

सूर्य थेट तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्यामुळे हे गोचर तूळ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नव्या संधी चालून येतील.

कामाच्या ठिकाणी तुमची कौशल्ये आणि जबाबदारीची जाणीव सर्वांना दिसेल. यामुळे वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल आणि तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळतील. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याची संधीही मिळेल.

तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवे मार्ग तयार होतील. पैसे आणि बचतीच्या बाबतीत चांगली प्रगती दिसेल. तुम्ही धाडसाने आणि योग्य नियोजनाने काम केल्यास या काळाचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल.

47
मकर

मकर राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये या सूर्य गोचरमुळे मोठे बदल घडून येतील. ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान आणि दबदबा वाढेल.

सूर्य, बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे तुमच्या व्यावसायिक आयुष्यात प्रगतीचे वारे वाहतील. तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळतील. काहींना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याचीही शक्यता आहे.

तुम्ही नोकरीत ज्या बदलांची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात, ते आता तुमच्या बाजूने होतील. उत्पन्नातही वाढ होईल. पण कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका, सर्व बाजू तपासूनच पाऊल उचला.

57
वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्य गोचर नातेसंबंध, भागीदारी आणि व्यवसायावर मोठा प्रभाव टाकेल. विशेषतः व्यापारी वर्गाचा नव्या लोकांशी संपर्क वाढेल.

तुमच्या जुन्या ओळखींमधून तुम्हाला अचानक काही चांगल्या बातम्या किंवा नव्या संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील.

व्यावसायिक दृष्ट्या तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. योग्य लोकांशी जोडले गेलेले संबंध तुम्हाला भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. त्यामुळे चालून आलेल्या संधींकडे दुर्लक्ष न करता त्यांचा हुशारीने वापर करा.

67
वृश्चिक

सूर्याच्या या गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या कामाचा वेग वाढेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहतील, पण ती लीलया पेलण्याची ताकद तुमच्यात येईल.

कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तुम्ही सर्व अडथळे पार करून पुढे जाल. जे लोक स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा नव्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ प्रयत्न वाढवण्याचा आहे.

सूर्याच्या प्रभावामुळे तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळू शकते. तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि कामाचा उरक तुम्हाला करिअरमध्ये यशाच्या शिखरावर घेऊन जाईल.

77
कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचा तूळ राशीतील प्रवेश शिक्षण, प्रवास, नशीब आणि नव्या प्रयत्नांसाठी अत्यंत अनुकूल ठरेल.

नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जे लोक परदेशात नोकरी करू इच्छितात, ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत किंवा अगदी नव्या क्षेत्रात नशीब आजमावू पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे.

विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या नव्या संधी मिळतील. उच्च शिक्षण, नवे कोर्सेस किंवा भविष्यातील योजनांबाबत तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

तसेच, पैसा आणि संपत्तीच्या बाबतीतही नव्या संधी निर्माण होतील. तुम्ही योग्य नियोजन केल्यास, हा काळ तुमच्या भविष्यातील प्रगतीचा भक्कम पाया रचेल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories