धनु राशीच्या लोकांसाठी साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यानंतरचा हा महत्त्वाचा काळ मानला जातो. काही ज्योतिषीय अंदाजानुसार धनु राशीसाठी शनी ढैय्या किंवा अर्धाष्टम शनीसारखे काळही वेगळे सांगितले जातात.
या काळात जुन्या समस्या त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणं, अनुभवातून काहीही न शिकता निर्णय घेणं आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं टाळायला हवं. जर भूतकाळात चुकलेली एखादी गोष्ट पुन्हा तुमच्यासमोर आली, तर यावेळी ती वेगळ्या दृष्टिकोनातून हाताळणं फायद्याचं ठरेल.
जर तुम्ही जुन्याच पद्धतीने वागत राहिलात, तर कामात विलंब, योजनांमध्ये सतत बदल किंवा मानसिक ताण वाढू शकतो.
शनी वक्री असण्याचा अर्थ काय?
शनी वक्री असणं म्हणजे फक्त घाबरून जाण्याचा काळ नाही. आपल्या चुका सुधारा, जबाबदाऱ्या झटकू नका, घाईघाईत निर्णय घेऊ नका आणि जुन्या गोष्टींकडे एकदा मागे वळून पाहा, असा या काळाचा साधा अर्थ आहे.
मेष, मीन, कुंभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनीच नाही, तर इतर राशींच्या लोकांनीही या काळात आपल्या वागण्यात संयम ठेवणं गरजेचं आहे. हे सर्व अंदाज ज्योतिषशास्त्राच्या सामान्य नियमांवर आधारित आहेत. प्रत्येकाची वैयक्तिक कुंडली, ग्रहांची स्थिती आणि दशा-अंतर्दशा यानुसार फळांमध्ये बदल होऊ शकतो.