Summer Fitness: उन्हाळ्यात घाम न गाळता वजन कमी करा! जाणून घ्या 4 सोपे व्यायाम

Published : Apr 25, 2026, 04:00 PM IST
Exercise

सार

उन्हाळ्यात जास्त घाम आणि थकवा न येऊ देता फिट राहायचंय? मग हे ४ सोपे व्यायामप्रकार नक्की करून पाहा. यामुळे कमी श्रमात जास्त कॅलरीज बर्न होतील.

दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चालला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगातून घामाच्या धारा लागतात आणि थकवाही खूप जाणवतो. अशावेळी व्यायाम करणं खूप अवघड वाटतं. पण फिट राहण्यासाठी थोडा का होईना व्यायाम गरजेचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही सोपे व्यायाम सांगणार आहोत, ज्यात घामही कमी येईल आणि कॅलरीजही बर्न होतील. या व्यायामांमुळे तुम्ही उन्हाळ्यातही एकदम फिट राहू शकता. चला तर मग, जाणून घेऊया या खास व्यायामांबद्दल.

योगामुळे शरीर राहील फिट

योगामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि तुम्ही फिटही राहता. तुम्ही रोज सूर्यनमस्कार, ताडासन यांसारखी योगासनं करू शकता. यामुळे जास्त घाम न गाळता शरीर टोन होतं आणि मानसिक आरोग्यही सुधारतं.

सायकलिंगने मसल्स होतील मजबूत

तुम्ही रोज हळू वेगाने सायकलिंगही करू शकता. हा एक कमी श्रमाचा व्यायाम आहे, जो १५ ते २० मिनिटांत बऱ्यापैकी कॅलरीज बर्न करतो. यामुळे तुमच्या पायांचे स्नायू (मसल्स) सुद्धा मजबूत होतील.

स्ट्रेचिंगमुळे कमी होईल आखडलेपणा

उन्हाळ्याच्या दिवसांत स्ट्रेचिंग करणं सोपं जातं. यामुळे तुमचं शरीर लवचिक (flexible) बनतं आणि थोड्या कॅलरीजही बर्न होतात. रोज सकाळी उठून १० ते १५ मिनिटं स्ट्रेचिंग केल्यास शरीरातील आखडलेपणा कमी होतो. तसंच, दुखापत होण्याचा धोकाही कमी होतो.

चालण्याने उन्हाळ्यातही राहा एकदम फिट

हलक्या व्यायामामध्ये चालणं (वॉकिंग) खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही उन्हाळ्यात रोज २० ते ३० मिनिटं चालू शकता. तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास नक्की चाला. यामुळे तुमच्या कॅलरीज तर बर्न होतीलच, पण तुमचा मूडही फ्रेश राहील.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Eating Peanuts : शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिताय? थांबा, हे नक्की वाचा
Oats Health Benefits : दररोज ओट्स खाण्याचे 7 जबरदस्त फायदे