काहीजणांना मसालेदार पदार्थ खाणे फार आवडते. मात्र अत्याधिक मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे नाकातोंडातून पाणी येई लागते. काहींना या स्थितीबद्दल कळत नाही. पण असे का होते याबद्दल तज्ज्ञांनी कारण सांगितले आहे.
मसालेदार आणि अत्याधिक गरम पदार्थांचे सेवन करताना तुमच्यासोबत कधी नाकतोंडातून पाणी आल्याची स्थिती निर्माण झालीय का? खरंतर, ही स्थिती आरोग्यासंबंधित कार्याचा एक भाग आहे. पण काही प्रकरणांत ही समस्या आरोग्यासंबंधित काही लक्षणांचे संकेत असू शकते. मसालेदार आणि गरम पदार्थांचे सेवन केल्यानंतर घाम किंवा नाकातोंडातून पाणी घेण्याच्या स्थितीला 'गस्टेटरी स्वेटिंग' असे म्हटले जाते.
24
'गस्टेटरी स्वेटिंग' म्हणजे नक्की काय?
‘गस्टेटरी स्वेटिंग’ म्हणजे एखादा पदार्थ खाणे किंवा खाण्याबद्दल विचार केल्यानंतर चेहरा, डोकं, मान आणि नाकाच्या आजूबाजूला घाम येणे. ही स्थिती सर्वसामान्यपणे तिखट पदार्थ किंवा गरम पदार्थांचे अत्याधिक सेवन करताना निर्माण होते. हेल्थ तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती आरोग्याच्या कार्याचा एक भाग आहे. यामध्ये घामाच्या ग्रंथी आणि शरीराचे तापमान नियंत्रित होते.
34
अभ्यासातून समोर आली ही बाब
एका अभ्यासानुसार, पदार्थाच्या चवीमुळे व्यक्तीला घाम येणे किती सामान्य आहे हे कळले. यासाठी जवळजवळ 2 हजारांहून अधिक लोकांवर एक प्रयोग करण्यात आला. यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांसह हेल्दी लोकांपैकी 5 टक्के जणांनी एखादा पदार्थ खाताना घाम घेण्याची समस्या असल्याची तक्रार केली. तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही आकडेवारी 10-13 टक्के असल्याचे दिसले. याशिवाय चेहरा आणि डोक्यातून घाम येत असल्याचेही काहींनी म्हटले.
शनल लाइब्रेरी ऑफ मेडिसीन यांच्या मते, मिरचीमधील कॅप्सिसिन (Capsaicin) नावाचे तत्व गस्टेटरी स्वेटिंगचे मुख्य कारण मानले जाते. कॅप्सिसिनमुळे शरीराचे तापमान वाढल्याची स्थिती निर्माण होते असे वाटते, पण खरंतर तसे होत नाही. ज्यावेळी कॅप्सिसिन जीभ आणि तोंडातील रिसेप्टर्सला उत्तेजित करतात तेव्हा मेंदूला उष्णतेचे संकेत जातात. यामुळे शरीराला थंड होण्यासाठी घामाच्या स्वरुपाची स्थिती निर्माण करावी लागते. हेच कारण आहे की, लाल मिरची, हिरवी मिरची किंवा चटपटीत पदार्थांचे सेवन केल्यानंतर चेहरा आणि डोक्यातून घाम येऊ लागतो.