दिवसभर घरकामात अडकून पडताय? आता जास्त वेळ आणि मेहनत घेण्याची गरज नाही. रोजची घरकामं सोप्या आणि जलद पद्धतीने पूर्ण करण्यासाठी काही खास टाइम सेव्हिंग टिप्स आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत. या टिप्स वापरल्यास तुमचं काम झटपट होईल.
घरकामांची यादी कधीच संपत नाही. स्वयंपाक, भांडी घासणे, कपडे धुणे, झाडलोट... ही लिस्ट वाढतच जाते. म्हणून, रोज करायच्या ३ महत्त्वाच्या कामांची आधी निवड करा. तुमच्या कुटुंबासाठी काय जास्त गरजेचं आहे, त्याला पहिलं प्राधान्य द्या. प्रत्येक काम परफेक्टच झालं पाहिजे, हा विचार थोडा बाजूला ठेवा. 'ठीक आहे, चालतंय' असं म्हटल्यास तुमचा बराच वेळ वाचेल.
27
रोज पूर्ण घर पुसायची गरज आहे का?
रोज पूर्ण घर पाण्याने पुसल्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाते. त्याऐवजी, रोज आधी घर झाडून घ्या किंवा व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा आणि जिथे जास्त घाण आहे, फक्त तिथेच पुसा. विशेषतः किचन आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ जास्त घाण असते. या जागांवर लक्ष केंद्रित केल्यास घर स्वच्छ दिसेल आणि रोज पूर्ण घर पुसण्याचा वेळही वाचेल.
37
सकाळीच स्वयंपाक करणे
स्वयंपाकासाठी पुन्हा-पुन्हा किचनमध्ये जाण्याने वेळ वाया जातो. शक्य असल्यास, सकाळीच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची तयारी एकाच वेळी करून ठेवा. सकाळी १५ ते ३० मिनिटं जास्त दिल्यास, संध्याकाळी किचनमध्ये जास्त वेळ उभं राहावं लागणार नाही. स्वयंपाक झाल्यावर भांडी साठवून न ठेवता, लगेच घासल्यास नंतर ते मोठं काम वाटणार नाही.
स्वयंपाक झाल्यावर लगेचच संपूर्ण किचन घासून-पुसून स्वच्छ करण्याची गरज नाही. त्या दिवशीच्या स्वयंपाकानंतर फक्त काऊंटरटॉप, स्टोव्ह आणि जास्त घाण झालेल्या जागा लगेच पुसून घ्या. डीप क्लिनिंग आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. तसेच, किचनमध्ये वापरला जाणारा कपडाही महत्त्वाचा आहे. घाणेरड्या कपड्याने पुसल्यास घाण एका जागेवरून दुसरीकडे पसरते. त्यामुळे, काऊंटरटॉप आणि स्टोव्ह पुसण्यासाठी स्वच्छ कापड वापरा.
57
घरातील वस्तू...
घरात वस्तू कुठेही पडलेल्या असल्यामुळे नंतर साफसफाई करणं एक मोठं काम होऊन बसतं. सोफा, डायनिंग टेबल, बेड किंवा किचन काऊंटरटॉप... कुठेही असो, वस्तू वापरल्यानंतर लगेच तिच्या जागी ठेवण्याची सवय घरातील प्रत्येकाने लावली पाहिजे. यासाठी रोज वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. एखादी वस्तू घेऊन जाताना, वाटेत असलेली दुसरी वस्तू तिच्या जागी ठेवली, तर घर अस्ताव्यस्त होणार नाही.
67
रात्रीच्या वेळी ही कामं केल्यास...
सकाळी उठल्यावर कामांचा डोंगर समोर दिसू नये, यासाठी रात्री काही मिनिटं दिली तरी पुरेशी आहेत. भांडी घासून ठेवणे, किचन काऊंटरटॉप पुसणे, सिंक स्वच्छ ठेवणे आणि इकडेतिकडे पडलेल्या वस्तू जागेवर ठेवणे, ही कामं रात्रीच पूर्ण करा. सकाळी उठल्यावर स्वच्छ किचन आणि आवरलेलं घर दिसल्यास सकाळची कामंही वेगाने सुरू होतात. तसेच, घरातील मुलांना आणि इतर सदस्यांना त्यांच्या वयानुसार छोटी-छोटी कामं वाटून द्या.
77
रविवारी...
इतर दिवशीच्या कामांव्यतिरिक्त, रविवारी सगळी मोठी कामं अंगावर घेतल्यास आरामासाठी वेळच मिळणार नाही. त्याऐवजी, आठवड्यात करायच्या कामांची एक छोटी लिस्ट आधीच तयार करा. कोणत्या दिवशी कपडे धुवायचे, कधी डीप क्लिनिंग करायची, कधी वस्तू आवरायच्या, हे ठरवून घेतल्यास एकाच दिवशी सर्व कामांचा ताण येणार नाही. घरकाम १०० टक्के पूर्ण करणं हे ध्येय न ठेवता, कमी वेळेत आणि कमी श्रमात घर नीटनेटके ठेवणं महत्त्वाचं आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.