आपण सहसा केळं खाऊन साल कचराकुंडीत टाकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का? हीच साल तुमच्या बागेतील झाडांसाठी एक जादूचं काम करू शकते. याच्या वापराने तुमचं घर फुले आणि फळांनी भरून जाईल. जाणून घेऊया ही सोपी ट्रिक.
केळं खाऊन साल फेकून देणं सामान्य आहे. पण आतापासून ही साल फेकू नका. या सालीचा योग्य वापर केल्यास तुमची बाग फुले आणि फळांनी बहरून जाईल. केळं जसं आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे, तसंच त्याची साल झाडांसाठीही फायदेशीर आहे.
25
झाडांसाठी खत म्हणून वापर करा
केळ्याची साल तुमच्या घरातील फुलझाडं आणि फळझाडांना उत्तम पोषण देते. या सालीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. ही खनिजं झाडांच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी मदत करतात. यामुळे झाडांना नैसर्गिकरित्या पोषक तत्वं मिळतात. किचनमधील या कचऱ्याचा तुम्ही झाडांसाठी उत्तम खत म्हणून वापर करू शकता.
35
केळ्याच्या सालीचं खत
घरात लावलेल्या फुलझाडांना आणि फळझाडांना केळ्याच्या सालीचं खत दिल्यास झाडं चांगली वाढतात. यामुळे झाडांना जास्त फुले येतात आणि फळंही चांगली लागतात. पेरू सारख्या फळांचा आकार, गुणवत्ता आणि संख्या वाढण्यास मदत होते. घरातच तुम्हाला भरपूर फळं मिळतील.
केळ्याची साल थेट झाडांच्या मुळाशी टाकण्याऐवजी एका वेगळ्या पद्धतीने वापरा. सालीचे छोटे तुकडे करून ब्लेंडरमध्ये बारीक करा. नंतर त्यात पाणी मिसळा की तुमचं 'मॅजिक बूस्ट' तयार, हे मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास त्यात आणखी पाणी टाका. आता हे पाणी झाडांसाठी वापरा.
55
झाडांना मिळेल नैसर्गिक पोषण
हे द्रावण झाडांच्या पानांवर टाकू नका. कुंडीतील किंवा जमिनीतील झाडाच्या खोडाभोवती मुळांजवळ टाका. पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण तुम्ही घरातील रोपांसाठीही (indoor plants) वापरू शकता. लक्षात ठेवा, हे पाणी रासायनिक खतांना पर्याय नाही, पण ते झाडांना नैसर्गिक पोषक तत्वं नक्कीच देतं. खनिजांचं प्रमाण जास्त असल्यामुळे वाढीसाठी हे खूप उपयुक्त आहे.