Banana Buying : केळी विकत घेताना तुम्हीही 'या' ५ चुका करता का? वेळीच सावध व्हा!

Published : Sep 02, 2026, 03:48 PM IST

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना केळी आवडतात. बाजारात गेल्यावर अनेकजण जास्त विचार न करता पिवळीधम्मक केळी उचलतात. पण चांगली केळी विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत.

PREV
16
केळी खरेदी करताना होणाऱ्या चुका
केळी चवीला छान आणि स्वस्तही असतात. सहज उपलब्ध असल्यामुळे अनेकजण भरपूर केळी विकत घेतात. पण बाजारात दिसलेला पिवळा घड लगेच उचलण्याऐवजी काही गोष्टी तपासणं महत्त्वाचं आहे. अनेकजण नकळत काही चुका करतात, ज्यामुळे घरी आणलेली केळी लवकर पिकतात, मऊ पडतात किंवा जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणूनच, केळी खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात ते पाहूया.
26
पूर्णपणे पिवळ्या रंगाची केळी निवडणे
अनेकजण केळी थोडी जरी हिरवी असली तरी ती कच्ची आहेत असं समजून बाजूला ठेवतात. पण जर तुम्हाला केळी लगेच खायची नसतील आणि काही दिवस घरात ठेवायची असतील, तर थोडी हिरवी असलेली केळी निवडणं चांगलं. पूर्ण पिवळी झालेली केळी आधीच पिकलेल्या अवस्थेत असतात, त्यामुळे ती लवकर मऊ पडण्याची शक्यता असते.
36
काळ्या डागांमुळे केळे खराब झाले असे समजणे
पिकलेल्या केळ्यांच्या सालीवर छोटे काळे डाग दिसणं सामान्य आहे. पण जर हे डाग खूप जास्त असतील, साल फुटलेली असेल, केळ्याला विचित्र वास येत असेल किंवा आतला गर वेगळा दिसत असेल, तर ती केळी घेऊ नका. मात्र, अनेकजण फक्त एक-दोन डाग दिसले म्हणून चांगली केळी नाकारतात.
46
आकार पाहून गुणवत्ता ठरवणे
मोठी आणि आकर्षक दिसणारी केळीच चांगली असतात, असा अनेकांचा समज असतो. पण फक्त आकार हा गुणवत्तेचा निकष नाही. केळं ताजं आहे का, त्याची साल घट्ट आहे का, कुठे भेगा पडल्या आहेत का, या गोष्टीही तपासा. लहान आकाराची केळीसुद्धा चांगल्या प्रतीची असू शकतात.
56
मऊ झालेली केळी विकत घेणे
तुम्हाला केळी लगेच खायची असतील, तर पूर्ण मऊ झालेली केळी निवडू शकता. पण ती काही दिवस घरात ठेवायची असतील, तर हा योग्य पर्याय नाही. जास्त मऊ झालेली केळी लवकर खराब होण्याची शक्यता असते. विशेषतः घरात कमी माणसं असतील, तर एकाच वेळी जास्त पिकलेली केळी घेतल्यास ती वाया जाऊ शकतात. त्यामुळे कुटुंबाची गरज ओळखून केळी निवडा.
66
केळी कशी साठवावी याकडे दुर्लक्ष करणे
बाजारातून आणलेली केळी इतर फळांसोबत ढीग करून ठेवल्यास ती लवकर मऊ पडू शकतात. विशेषतः पिकलेली केळी गरम ठिकाणी ठेवल्यास ती आणखी वेगाने पिकतात. त्यामुळे घरी आणल्यानंतर केळी हवा खेळती राहील अशा आणि जास्त गरम नसलेल्या ठिकाणी ठेवावीत.
Read more Photos on

Recommended Stories