International Women's Day 2025 : 8 मार्चला साजरा होणार जागतिक महिला दिन, वाचा यंदाची थीम

Published : Mar 04, 2025, 08:49 AM IST
Womens Day 2025

सार

प्रत्येक वर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षीची थीम Accelerate Action अशी आहे. म्हणजेच महिलांच्या अधिकारांना वेगाने सुनिश्चित करण्यावर जोर देणारी आहे.

International Women's Day 2025 : प्रत्येक वर्षी 8 मार्चला संपूर्ण जगभरात महिला दिवस साजरा केला जातो, जो स्री सशक्तिकरण आणि समानतेचा प्रतीक आहे. खरंतर, महिलांनी सध्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. यामुळे महिला दिन केवळ शुभेच्छा देऊन नव्हे तर त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्याचा खरा दिवस आहे. महिलांना त्यांचे अधिकार, सन्मान आणि आयुष्यातील संधींसाठी मदत करण्याचा हा दिवस आहे.

यंदाची थीम

यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2025 ची थीम "Accelerate Action" ठेवण्यात आली आहे. याचा मुख्य उद्देश महिलांना समानता देण्याची प्रक्रिया वेगाने करणे आहे. ही थीम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासह ठोस पावले उचलण्यावर जोर देते. याचा अर्थ असा आहे की, केवळ चर्चा करण्याएवजी आता महिलांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. याअंतर्गत महिलांसाठी काही योजना लागू करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन महिलंना रोजगार आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळेल.

8 मार्चलाच का महिला दिन?

8 मार्चला महिला दिवस साजरा करण्याची परंपरा वर्ष 1917 मध्ये रशियातील महिलांद्वारे करण्यात आलेल्या आंदोलनासंदर्भातील आहे. यावेळी रशियात ज्युवेलियन कॅलेंडर प्रचलित होते. यानुसार फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा रविवार 23 फेब्रुवारी होता. जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 8 मार्च होता. महिलांनी ब्रेड आणि पीस (रोटी आणि शांती) ची मागणी करत आंदोलन केले. येथून रशियाच्या क्रांतीचा पायंडा पडला. या आंदोलनानंतर जार शासन संपले आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. या ऐतिहासिक घटनेच्या कारणास्तव 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

PREV

Recommended Stories

हिवाळ्यात पायांचे सौंदर्य वाढवा, निवडा फॅन्सी फ्लॉवर जोडवी डिझाइन
फक्त 3 ग्रॅममध्ये रॉयल नथ! लग्नासाठी बनवा 'हे' स्टायलिश आणि मजबूत डिझाईन्स!