बेरीज नेहमी ओलावा नसलेल्या ठिकाणी ठेवाव्यात. धुतल्यानंतर त्या पूर्णपणे सुकवण्यास विसरू नका. त्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा. तसेच, हवेशीर डब्यात ठेवण्याची काळजी घ्या.
केळी थंड आणि जास्त प्रकाश नसलेल्या ठिकाणी ठेवावी. कच्ची केळी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. केळ्याचे देठ प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवल्यास ती लवकर पिकत नाहीत.
सफरचंद ताजे ठेवण्यासाठी, ते ओल्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. पण सफरचंद इतर फळांसोबत ठेवू नका. यामुळे सफरचंदाचा रंग बदलू शकतो.
अॅव्होकॅडो नेहमी रूम टेंपरेचरला ठेवावा. पण पिकल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवा. कापलेल्या अॅव्होकॅडोवर थोडा लिंबाचा रस लावल्यास तो खराब होत नाही.
संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखी फळे रूम टेंपरेचरवर आठवडाभर चांगली राहतात. जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी ती फ्रिजमध्ये ठेवणे चांगले.
Rameshwar Gavhane