Shravan 2025 Recipe : श्रावणातील शनिवारी तयार करा राजगिऱ्याचे थालीपीठ, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Published : Jul 25, 2025, 03:03 PM ISTUpdated : Jul 26, 2025, 06:07 PM IST
Rajgira Thalipeet

सार

Shravan 2025 : आजपासून श्रावणाला सुरुवात झाली असून यावेळी श्रावणी शनिवार आणि सोमवारला फार महत्व असते. अशातच शनिवारी उपवास असल्यास राजगिऱ्याचे थालीपीठ तयार करू शकता. याचीच सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. 

Rajgira Thalipeet Recipe : श्रावण महिन्यात बहुतांशजण श्रावणी शनिवारी आणि सोमवारी उपवास करतात. यावेळी उपवासाला काय करावे असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. अशातच राजगिरा (Amaranth) हे उपवासात खाल्ले जाणारे एक अत्यंत पोषक आणि सहज पचणारे पीठ आहे. त्याचा उपयोग करून आपण राजगिरा थालीपीठ सहज बनवू शकतो. जाणून घेऊया राजगिराचे थालीपीठ कसे तयार करायचे याची स्टेप बाय स्टेप रेसिपी.

सामग्री : 

  • राजगिरा पीठ – १ कप
  • उकडलेले बटाटे – २ मध्यम आकाराचे (किसून किंवा मॅश करून)
  • सैंधव मीठ – चवीनुसार
  • हिरव्या मिरच्या – १-२ (बारीक चिरून)
  • जिरं – १/२ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून (ऐच्छिक)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • तूप / शेंगदाण्याचे तेल – थालपीठ भाजण्यासाठी
  • पाणी – लागेल तसे

कृती : 

  • एका मोठ्या परातीत राजगिरा पीठ, किसलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, जिरं, सैंधव मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या.
  • थोडं थोडं पाणी घालत मऊसर गोळा भिजवा. पिठात खूप पाणी घालू नका, कारण बटाट्यामुळे ओलसरपणा येतो.
  • एक प्लास्टिकची पिशवी किंवा केळीचं पान घ्या. त्यावर थोडं पाणी शिंपडून थोडं पीठ घ्या आणि हाताने थापून थालीपीठाचा आकार द्या. मधोमध एक भोक करा, त्यामुळे थालीपीठ नीट शिजते.
  • गरम तव्यावर थोडं तूप / तेल टाका. थालपीठ हळूच तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • गरम गरम राजगिरा थालीपीठ दही, शेंगदाण्याची चटणी किंवा साजूक लोण्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

VIDEO : राजगिऱ्याच्या थालीपीठाची संपूर्ण रेसिपी येथे पाहा 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सोन्याला टक्कर! २०२६ मध्ये सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहतील 'हे' ८ इअररिंग्स; फॅशन आयकॉन बनण्यासाठी लगेच पाहा!
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!