कर्मफळदाता शनिदेव लवकरच मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कोणत्या तीन राशींवर या शनि गोचराचा सर्वात वाईट परिणाम होईल आणि त्यांना पुढची अडीच वर्षे सांभाळून राहावं लागेल, ते जाणून घेऊया.
२०२६ मध्ये शनी मीन राशीतच राहील. पण २०२७ मध्ये शनीचं एक महत्त्वाचं राशीपरिवर्तन होणार आहे. ज्योतिषीय अंदाजानुसार, ३ जून २०२७ रोजी शनी मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर तो वक्री होऊन मीन राशीत परत जाईल आणि २३ फेब्रुवारी २०२८ रोजी पुन्हा मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रात शनी आणि मंगळ यांचा स्वभाव परस्परविरोधी मानला जातो. त्यामुळे हे गोचर काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतं.
24
वृषभ राशी
२०२७ च्या शनी गोचरानंतर वृषभ राशीच्या लोकांची साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. या काळात पैशांशी संबंधित निर्णय घाईत घेणं टाळा. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे उत्पन्नानुसार खर्चाचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. कर्ज घेणं, मोठी गुंतवणूक करणं किंवा भागीदारीतील व्यवसायाबद्दल महत्त्वाचे निर्णय घेताना जास्त काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातही लहान-सहान मतभेद होण्याची शक्यता आहे.
34
मीन राशी
शनीच्या या राशीबदलामुळे मीन राशीच्या लोकांचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्न अपेक्षेप्रमाणे असले तरी, अनपेक्षित खर्चामुळे पैसे वाचवणं कठीण होऊ शकतं. विशेषतः नोकरी आणि व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. कठोर परिश्रम करूनही त्याचं फळ मिळण्यास थोडा उशीर होऊ शकतो. यामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न, बचत आणि खर्चाचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे.
२०२७ मध्ये शनी थेट मेष राशीत प्रवेश करत असल्यामुळे, या राशीच्या लोकांना गोचराचा मुख्य परिणाम भोगावा लागेल. पैशांच्या बाबतीत तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे, अनावश्यक आणि चैनीच्या गोष्टींवरचा खर्च कमी करणं चांगलं राहील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रगतीचा वेग कमी वाटला तरी, प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे.