Toothbrush Care : तुमचा टूथब्रश कधी बदलायचा? तो इतरांसोबत शेअर करावा का?

Published : Sep 05, 2026, 01:19 PM IST

आपण आपला टूथब्रश किती महिन्यांनी बदलला पाहिजे? त्याची काळजी कशी घ्यावी? आणि तो इतरांसोबत शेअर करणं योग्य आहे का? जाणून घेऊया.

PREV
16
टूथब्रशची योग्य निगा
रोज सकाळी आणि रात्री दात घासणं तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण, आपण योग्य वेळी आपला ब्रश बदलतो का? एकच टूथब्रश जास्त काळ वापरल्यास काय होतं? याबद्दल दंतवैद्य काय सांगतात ते जाणून घेऊया.
26
टूथब्रश कधी बदलायचा?
अमेरिकन डेंटल असोसिएशन (ADA) च्या शिफारशीनुसार, साधारणपणे दर 3 ते 4 महिन्यांनी टूथब्रश बदलावा. पण त्याआधीच ब्रशचे केस (bristles) विस्कटलेले किंवा वाकलेले दिसल्यास, समजून जा की ब्रश बदलण्याची वेळ आली आहे.
36
ब्रशची काळजी कशी घ्यायची?
प्रत्येक वेळी दात घासून झाल्यावर ब्रश स्वच्छ पाण्याने धुवा. तो उघड्या हवेत सरळ उभा करून वाळवा. ओला ब्रश लगेच बंद डबीत किंवा कव्हरमध्ये ठेवल्यास त्यात जंतू वाढू शकतात. तसेच, तुमचा ब्रश इतरांच्या ब्रशला चिकटणार नाही, याचीही काळजी घ्या.
46
ब्रश शेअर करणं योग्य आहे का?
टूथब्रश एकमेकांसोबत शेअर करणं ही चांगली सवय नाही. एका व्यक्तीच्या तोंडातील बॅक्टेरिया आणि इतर जंतू ब्रशच्या केसांमध्ये अडकू शकतात. जेव्हा दुसरी व्यक्ती तोच ब्रश वापरते, तेव्हा ते जंतू तिच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. दात घासताना हिरड्यांना जखम झाल्यास किंवा रक्त आल्यास संसर्गाचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे, कुटुंबातही प्रत्येकाने वेगळा ब्रश वापरावा.
56
ब्रश खरेदी करताना हे लक्षात ठेवा
नवीन टूथब्रश खरेदी करताना, त्याचे केस मऊ (Soft bristles) आणि त्याचे डोके लहान आकाराचे असेल याची खात्री करा. केसांची टोकं गोलाकार आणि मऊ असतील, तर हिरड्यांना इजा न होता दात व्यवस्थित घासता येतात.
66
दिवसातून किती वेळा दात घासावेत?
अमेरिकन डेंटल असोसिएशन (ADA) नुसार, दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी) प्रत्येकी 2 मिनिटं फ्लोराईड टूथपेस्टने दात घासले पाहिजेत. यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दात घासताना जास्त जोर लावू नका. पुढच्या दातांसोबतच, दातांच्या आतली, बाहेरची आणि वरची बाजूही हळुवारपणे स्वच्छ करा.
Read more Photos on

Recommended Stories