
Samsung Smartphone Price Hike : भारतातील स्मार्टफोन ग्राहकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात काहीशी महागडी ठरू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगने जानेवारी 2026 पासून त्यांच्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. Galaxy A Series आणि Galaxy F Series मधील निवडक मॉडेल्स आता अधिक दरात विकले जाणार आहेत. वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीचा दबाव हे या किंमतवाढीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, नव्या किमती 5 January 2026 पासून लागू झाल्या आहेत.
टिपस्टर Abhishek Yadav यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy A56 च्या सर्व स्टोरेज व्हेरिएंट्सच्या किमतीत थेट Rs 2,000 ची वाढ करण्यात आली आहे.
या सर्व किमतींमध्ये GST समाविष्ट आहे.
हा फोन मध्यम श्रेणीतील ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.
या वाढीचा थेट परिणाम बजेट स्मार्टफोन खरेदीदारांवर होण्याची शक्यता आहे.
सध्या Samsung ने Galaxy S25 Series, Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 या फ्लॅगशिप मॉडेल्सच्या किमती वाढवल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. बाजारात चर्चेनुसार, आगामी Galaxy S26 Series वरही ही दरवाढ लागू होणार नाही. सध्या कंपनीचा भर मध्यम श्रेणी आणि बजेट सेगमेंटमधील किंमत रचना अपडेट करण्यावर असल्याचे दिसून येते.